युरोपचा लहरी तुघलक; सार्वजनिक वाहतूक केली फूकट!

मुहम्मद बिन तुघलक हा चौदाव्या शतकात दिल्लीच्या गादीवर बसणारा राजा. हा राजा इतर राजांपेक्षा विद्वान होता. तो दानधर्म देखील करायाचा आणि जनतेचा विचारही करायचा. परंतु, त्याने योग्य निर्णय न घेतल्याने त्याची गणना इतिहासात मुर्ख राजा म्हणून केली जाते. सध्या झेविअर बेटल यांची वाटचालही मुहम्मद बिन तुघलकासारखी दिसत आहे.  

Lakjambarg
mohamad tughalak
युरोपचा लहरी तुघलक; भांगेची खरेदी-विक्री केली कायदेशीर

सध्या एक लहरी तुघलक युरोपातील लक्झेमबर्ग या देशात पंतप्रधान म्हणून निवडून आला आहे. या पंतप्रधानाचे नाव झेविअर बेटल असे आहे. बुधवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी देशात भांगेची खरेदी-विक्री आणि साठवणूक करणे कायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता भांगेची खरेदी-विक्री प्रकरणी तेथील लोकांना अटक केली जाणार नाही. त्याचबरोबर बेटल यांनी सर्व सार्वजनिक वाहतूक मोफत केली आहे. कुठल्याही देशाचा सामाजिक आणि आर्थिक विकास हा त्या देशाच्या राजकर्त्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे राज्यकर्त्यांनी प्रचंड इच्छाशक्ती, महत्त्वकांक्षी आणि कर्तव्यदक्ष राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. हे तिनही गुण सत्ताधाऱ्यांमध्ये राहिले नाही तर त्यांचा मुहम्मद बिन तुघलक होतो. मुहम्मद बिन तुघलक हा चौदाव्या शतकात दिल्लीच्या गादीवर बसणारा राजा. हा राजा इतर राजांपेक्षा विद्वान होता. तो दानधर्म देखील करायाचा आणि जनतेचा विचारही करायचा. परंतु, त्याने योग्य निर्णय न घेतल्याने त्याची गणना इतिहासात मुर्ख राजा म्हणून केली जाते. सध्या झेविअर बेटल यांची वाटचालही मुहम्मद बिन तुघलकासारखी दिसत आहे.

परिवहन सेवा केली मोफत

झेविअर बेटल यांनी पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेच त्यांनी लक्झेमबर्ग देशात सार्वजनिक परिवहन सेवा मोफत केली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. बस, ट्रेन आणि ट्राम मोफत केले की लोक आपल्या खासगी कार सोडून सरकारी बसमधून प्रवास करतील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. परंतु, ही सुविधा मोफत केल्याने देशाच्या तिजोरीला किती रुपयांचे नुकसान होऊ शकतेचे, याचा विचार त्यांनी केला नाही. सध्या लक्झेमबर्ग येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे डगमगलेली आहे. शहराची लोकसंख्या एक लाख १० हजार आहे. त्यात भर म्हणून दररोज दोन ते चार लाख लोक कामासाठी बाहेरच्या देशातून येतात. बेटल सत्तेवर येण्यापूर्वी भांगची खरेदी-विक्री किंवा साठवणूक करणाऱ्या नागरिकांना अटक केली जात होती. मात्र, बटेल यांनी या गोष्टींना मान्यता देऊन भांग खरेदी-विक्री आणि साठवणूकीला कायदेशीर केले आहे.


हेही वाचा – पुण्याचे सिंघम पोलीस आणि वाहतूक कोंडीवर जालीम उपाय!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here