घरदेश-विदेशलालूंवर २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु

लालूंवर २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु

Subscribe

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या डाव्या पायाला फोड आले असून त्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्याचे समजते.

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या डाव्या पायाला फोड आले असून त्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्याचे समजते. त्यांच्या तब्येतीवर डॉक्टर २४ तास देखरेख ठेऊन आहेत. लालू यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, पायाला फोड्या आल्यामुळे त्यांना चालणेही कठिण होत आहे. त्यामुळे शौचालयाला जाण्यासही अडचणी येत आहेत. लालू प्रसाद यादव हे राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज (रिम्स) या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून डॉ. उमेश प्रसाद यांच्यावर उपचार करत आहेत.

मधुमेहाचा त्रास असल्याने समस्या वाढल्या

डॉक्टरांनी सांगितले की, पायाला फोड आल्यामुळे मधुमेह असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या शुगरचे प्रमाण वाढले आहे. तसेच ब्लड प्रेशरही नियंत्रणात आणायचे आहे. त्यासाठी लालू यांना देण्यात येणारे इंसुलनचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्यांचे क्रिएटिनिन देखील वाढले असून १.५ वरून १.८५ इतके झाले आहे. त्यांचे ब्लड सेल काउंट १२ हजार झाले आहे. सर्वसामान्यपणे हे ४ ते ८ हजार असणे अपेक्षित असते. डॉक्टरांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, संसर्गजन्य फोड्या पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी वेळ लागू शकतो.

- Advertisement -

चाराघोटाळा प्रकरणी झाली आहे शिक्षा 

लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं असून त्यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता.

वाचा : लालू प्रसाद यादव गमावू शकतात १२८ कोटींची मालमत्ता

- Advertisement -

वाचा : लालू प्रसाद यादव न्यायालयासमोर शरण; तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये पाठवले

वाचा : लालू प्रसाद यांना डिस्चार्ज; ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -