घरताज्या घडामोडीलालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल; श्वास घेण्यास होत आहे त्रास

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल; श्वास घेण्यास होत आहे त्रास

Subscribe

लालू प्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रिम्स प्रशासनाने त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना श्वसनास त्रास होत असून त्यांची किडनी २५ टक्केच काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान अर्थात रिम्सचे निर्देशक डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘यादव यांना दोन दिवसांपासून श्वसनाला त्रास होत होता. त्यानंतर त्यांची शुक्रवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत त्यांना न्युमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांचे वय जास्त असल्याचे लक्षात घेऊन त्यांना शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एअर Ambulanceद्वारे दिल्लीला रवाना करण्यात आले आहे’.

- Advertisement -

मेडिकल समिती गठीत

कारागृह प्रशासनाच्या सल्ल्यानुसार रिम्सने आठ विविध विशेषज्ञांची एक समिती गठीत केली आहे. या समितीने लालू यांच्या आरोग्याची तपासणी केली. या तपासणीनंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये रवाना करण्याचा निर्णय घेतला.

यादव कुटुंबीय पोहोचले रुग्णालयात

लालू प्रसाद यादव यांना एम्स रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच यादव कुटुंबिय एम्स रुग्णालयात दाखल झाले आहे. लालू यांचे पुत्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि पत्नी राबडी यादव दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांनी ट्विट केले आहे की, ‘लालूजी यांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांची किडनी २५ टक्केच काम करत आहे. मी, आई आणि भाऊ रांची जात आहोत. आम्ही त्यांना भेटण्यासाठी विशेष परवानगी घेतली आहे’.

- Advertisement -

लालूंच्या अनेक केल्या चाचण्या

लालू यांच्या शुक्रवारी अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ईको, ईसीजी, अल्ट्रासाऊंड, केयूबीपी आणि एचआरसीटी या चाचण्यांचा समावेश आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, निमोनिया सोडला तर त्यांच्या अनेक चाचण्या सामान्य आल्या आहेत.


हेही वाचा – एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी; ३० जानेवारीला परिषद होणार


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -