घरदेश-विदेशदक्षिणी आसाम जिल्ह्यात पावसामुळे भूस्खलन; २० जणांचा मृत्यू

दक्षिणी आसाम जिल्ह्यात पावसामुळे भूस्खलन; २० जणांचा मृत्यू

Subscribe

मुसळधार पावसामुळे दक्षिणी आसाम भागात भूस्खनाची घटना घडली असून यामध्ये तब्बल २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. यात मृत्यूमुखी पडलेले दक्षिणी आसामच्या विविध जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. देशात मान्सूनचे आगमन होत असून पूर्वोत्तर भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. भूस्खलनाच्या घटना दक्षिण आसाममधील बराक घाटी परिसरात घडल्या आहेत. यामध्ये कछार जिल्ह्यातील सात, हेलाकांडी जिल्ह्यातील सात तर करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पावसाने जोर धरला असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भूस्खलनाच्या घटनांमध्ये काही जण जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. या घटनांची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्य पाठवले आहे. आसाममध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. येथील २१ जिल्ह्यातील तब्बल १० लाख नागरिकांना याचा फटका बसला आहे. हा ठिकाणांचा संपर्क तुटला असून कित्येकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा –

Video: सहा वर्षाच्या मुलाचे सिक्स पॅक अॅब; बघा अशी घेतोय मेहनत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -