घरदेश-विदेशपत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा संशय; चार्जरच्या वायरने गळा आवळून तिसऱ्या पतीचा केला खून

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा संशय; चार्जरच्या वायरने गळा आवळून तिसऱ्या पतीचा केला खून

Subscribe

पतीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने त्याच विचाराने पत्नीने गळा आवळून केला त्याचा खून

पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत असल्याने महिलेने चक्क चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पश्चिम बंगालमधल्या एका स्थानिक न्यायालयाने महिला वकिलाला नवऱ्याच्या हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे. आनंदिता पाल डे असं या महिलेचे नाव असून तिला तिचा नवरा रजत डे याच्या हत्येबद्दल शिक्षा सुनावली जाणार असून तिला शिक्षा काय द्यायची हे न्यायालय बुधवारी जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वयवर्ष ३५ असणारा आनंदिताचा नवरा रजत हा देखील वकील होता आणि तो कोलकाता उच्च न्यायालयात वकिली करत होता. विधाननगर आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या न्यू टाऊन भागात हे दाम्पत्य राहात होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये रजत डे याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येच्या ५ दिवसांनंतर आनंदिता हिला अटक करण्यात आली होती. आनंदिताने तिचा गुन्हा कबूल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली असून रजतच्या हत्येची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांत दिली होती. त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं, की त्यांच्या मुलाला हे स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपलीच बायको जिच्यासोबत आपण बाहेर जेवायला गेलो होतो, ती त्याच रात्री आपला खून करेल.

- Advertisement -

नेमके काय घडले?

२५ नोव्हेंबर २०१८ च्या रात्री आनंदिता आणि रजत यांच्यात जोरदार वाद-विवाद झाले होते. आनंदिताच्या कथित विवाहबाह्य संबंधांवरून हे भांडण झाले असल्याचे सांगितले जात आहे तर या भांडणानंतर रजत याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे आनंदिताच्या मनात आपणच नवऱ्याला ठार मारूया असा विचार येण्यास सुरूवात झाली. यावेळी तिने मोबाईलचा चार्जर घेतला आणि त्या वायरने गळा आवळून रजतचा खून केला. सुरुवातीला तिने असा दावा केला होता की बेडशीटच्या सहाय्याने गळफास बनवत रजतने ही आत्महत्या केली होती. मात्र तिचं पितळ पोलीस चौकशीत उघडं पडलं. आनंदिताचं हे तिसरं लग्न होतं आणि तिला रजतपासून एक दीड वर्षांचा मुलगा देखील असल्याची माहिती मिळतेय.


धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; हात पकडून घेतले चुंबन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -