Lebanon Beirut Blasts : भीषण स्फोटात ७० जण ठार; ४००० जखमी

लेबनानची राजाधानी बेरूतमध्ये काल, मंगळवारी दोन भयंकर स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरले. या स्फोटांमध्ये ७० जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार जण जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेले नाही. मात्र हे दोन इतके भयानक स्फोट होता की त्यामुळे बेरूत हादरले. देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी या स्फोटांमुळे झालेल्या जिवीतहानीसंदर्भातील माहिती दिली आहे.

अवघ्या १५ मिनिटांच्या आतच दोन महाभयंकर स्फोट बेरूतमध्ये झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरले. येथील अनेक रस्त्यांवर धुराचे लोट दिसले. अनेक गाड्यांवर इमारतींचे अवशेष पडल्याने रस्त्यांवर नासधुस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या.

हेही वाचा –

कोकणात जाण्यासाठी एसटीची व्यवस्था