घरताज्या घडामोडीजेसिका लाल हत्या प्रकरणः दोषी मनू शर्माची सुटका, उपराज्यपालांनी दिली परवानगी

जेसिका लाल हत्या प्रकरणः दोषी मनू शर्माची सुटका, उपराज्यपालांनी दिली परवानगी

Subscribe

१९९९ मधील जेसिका लाल हत्या प्रकरणी दोषी मनू शर्मा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र त्याच्या मुदतपूर्व सुटकेची परवानगी उपराज्यपालांनी दिली आहे.

दिल्लीतील जेसिका लाल हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मनू शर्मा याची मुदतीपूर्व सुटका करण्यात आली आहे. शर्मा याच्यासह अन्य १८ कैद्यांना मुदतपूर्वी सुटका करण्याच्या आदेशाला राज्यपाल अनिल बैजल यांनी मंजुरी दिली आहे. तिहाड जेलमध्ये असलेल्या कैद्यांना मुदतीपूर्व सुटका करण्याबाबत सोमवारी सेंटेंस रिव्यू बोर्ड यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये ३९ कैद्यांची प्रकरणे ठेवली गेली होती. यापैकी २२ कैद्यांना मुदतपूर्व सुटका करण्याची मान्यता दिली. त्यानंतर अंतिम निर्णय उपराज्यपालांकडे सोडण्यात आला होता.

दोषी मनुला चांगल्या वर्तनामुळे जन्मठेपेची शिक्षा सुनवाण्यात आली होती. पण जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी त्याला तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

यापूर्वी मनुची केस आणखी पाच वेळा एसआरबीमध्ये ठेवली गेली होती. मंडळाकडून मनू १४ वर्ष तुरुंगात असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान त्याला पॅरोल आणि फर्लो रजेवर सोडण्यात आले आहे. त्यावेळी तो वेळेवर पुन्हा तुरुंगात येत होता. त्याचबरोबर तुरुंगात असताना त्याचे चांगले वर्तन होते.

१९९९ मध्ये जेसिकाची हत्या झाली

२० एप्रिल १९९९ रोजी तत्कालीन काँग्रेसचे नेते विनोद शर्मा यांचा मुलगा मनू शर्माने जेसिकाला दिल्ली बारमध्ये गोळ्या घालून ठार मारले होते. डिसेंबर २००६ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात मनू शर्मा याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शर्मा कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि एप्रिल २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

- Advertisement -

मनू व्यतिरिक्त उपराज्यपाल अनिल बैजल यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या १९ जणांना मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – मनोज तिवारींची उचलबांगडी; आदेश गुप्ता दिल्ली भाजपचे नवे अध्यक्ष


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -