घरदेश-विदेशनौदलाच्या सेवेत 'या' दिवशी दाखल होणार पहिली महिला वैमानिक

नौदलाच्या सेवेत ‘या’ दिवशी दाखल होणार पहिली महिला वैमानिक

Subscribe

नौदलाकडून प्रशिक्षण मिळालेल्या त्या पहिल्या महिला वैमानिक ठरणार आहेत.

भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी पहिला महिला वैमानिक सज्ज झाली आहे. लेफ्टनंट शिवांगी असे त्यांचे नाव आहे. ४ डिसेंबर रोजी नौदल दिन आहे. त्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच २ डिसेंबर रोजी लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार आहेत, अशी माहिती सैन्यदलाच्या सूत्रांनी दिली आहे. नौदलाकडून प्रशिक्षण मिळालेल्या त्या पहिल्या महिला वैमानिक ठरणार आहेत.

लेफ्टनंट शिवांगी यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २ डिसेंबर रोजी भारतीय नौदलात रुजू होणार आहेत. त्यानुसार भारतीय नौदलात उत्तीर्ण होऊन निवड होणाऱ्या शिवांगी या पहिल्या महिला वैमानिक ठरणार आहेत. लेफ्टनंट शिवांगी या मुळच्या मुझफ्फरपूरच्या आहेत. डीएव्ही पब्लिक स्कूल येथून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

- Advertisement -

भारतीय नौदलाकडून घेण्यात आलेल्या २७ एनओसी कोर्स मध्ये शिवांगी यांनी Ezhimala येथील नौदल अकादमीत प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर मागील वर्षी जून महिन्यात वाईस ऍडमिरल ए.के. चावला यांच्याकडून शिवांगी यांना कमिशन्ड करण्यात आलं.

भारतीय नौदलातील एव्हिएशन विभागात एअर ट्राफिक कंट्रोल अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण विभागात महिला अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश असतो. ‘ऑब्जर्व्हर’ म्हणून रुजू असणाऱ्या या महिला अधिकारी या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जबाबदार असतात. साऊथर्न नेव्हल कमांड येथे शिवांगी या सध्या प्रशिक्षणार्थी आहेत. २ डिसेंबर रोजी ड्रोनिअर एअरक्राफ्ट उड्डाणाची अधिकृत परवानगी मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -