घरदेश-विदेशआता एवढंच राहिलं होतं; महाप्रसादात दारुचे वाटप!

आता एवढंच राहिलं होतं; महाप्रसादात दारुचे वाटप!

Subscribe

उत्तर प्रदेश मधील हरदोई येथील भाजप नेते नितीन अग्रवाल यांनी खाद्यपदार्थांसह दारुचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपकडून पैशांचा वापर केला गेल्याचे अनेक आरोप करण्यात आले. आता तर भाजप पक्षाने चक्क मंदिराच्या कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारुच्या बाटल्यांचे वाटप केले असल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे समोर आले आहे. भाजपा नेते नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन याने सोमवारी पारसी समाजासाठी श्रावण देवी मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी खाद्यपदार्थांच्या पाकिटात दारुच्या बाटल्या भरलेल्या होत्या. बिझनेस स्टँडर्डने हे वृत्त दिले आहे.

- Advertisement -

खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारुचे वाटप

उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील श्रावण देवी मंदिरात भाजपा नेते नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन याने सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात येणाऱ्या नागरिकांना खाद्यपदार्थ देण्यात आले. या खाद्यपदार्थांमध्ये दारुच्या बाटल्यांचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये नितीन अग्रवाल ‘व्यासपीठावरुन खाद्य पदार्थांची पाकिटे गावाच्या प्रमुखाला देण्यात येतील, त्यांच्याकडून तुम्हाला ही पाकिटे मिळतील’, अशी घोषणा करताना दिसत आहेत. ‘खाद्यपदार्थांच्या पाकिटाचे वाटप सुरु असून तिथे गावच्या प्रमुखांनी जाऊन पाकिटे आपल्या ताब्यात घ्यावीत आणि सोबत आलेल्या लोकांना वाटप करावे’, असे आवाहन अग्रवाल हे उपस्थितांना करत होते.

दारुची बाटली मिळाली

दरम्यान, खाद्यपदार्थांच्या पाकिटात दारुची बाटली मिळाली असल्याचं कार्यक्रमात आलेल्या एका मुलाने सांगितले. त्यामुळे ही घटना समोर आली. तसेच ‘मी माझ्या वडिलांसोबत लांबून आलो आहे. नितीन अग्रवाल यांनी हे पाकिट दिले’, असे या मुलाने सांगितले.

- Advertisement -

अग्रवाल यांच्यावर टीका

हरदोई येथील भाजप खासदार अंशुल वर्मा यांनी खाद्यपदार्थांसह दारुचे वाटप केल्याबद्दल अग्रवाल यांच्यावर टीका केली आहे. तसेच ‘पक्षनेत्यांकडे आपण याची तक्रार करु’, असे वर्मा यांनी सांगितले आहे. नरेश अग्रवाल आधी समाजवादी पार्टीमध्ये होते. २०१८ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे आयोजन करणारा त्यांचा मुलगा नितीन हा स्थानिक आमदार आहे.


वाचा – गुजरात : भाजपच्या माजी आमदारांची गोळी घालून हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -