Live Update: अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड NCB कार्यालयात दाखल

Live Update News

अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी गॅब्रिएला एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४७ हजार ९०५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८६ लाख ८३ हजार ९१७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २८ हजार १२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८० लाख ६६ हजार ५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ४ लाख ८९ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त झाल्या आहेत. २८ ऑक्टोबर रोजी त्या कोरोनाबाधित आढळल्या होत्या.


जगातील कोरोनाचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ५ कोटी २४ लाख ३२ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ८९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ कोटी ६६ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


बुधवारी दिवसभरात राज्यात ४,९०७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,३१,८३३ झाली आहे. राज्यात ८८,०७० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५ हजार ५६० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा