Live Updated: मणिपुरचे मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

News Live Update
ताज्या बातम्यांचे लाईव्ह आपडेट

मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून दिली आहे.


नितीश कुमार यांची एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या सकाळी ११.३० वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.


देशातील गेल्या २४ तासांत ४१ हजार १०० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८८ लाख १४ हजार ५७९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २९ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला असून ८२ लाख ५ हजार ७२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख ७९ हजार २१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


जगातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी १२ लाख पार झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ कोटी ४३ लाखांवर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १३ लाख १८ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ७८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


शनिवारी दिवसभरात राज्यात ४,१३२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,४०,४६१ झाली आहे. राज्यात ८४,०८२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १२७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४५,८०९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा