Live Update: गोव्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेत्या मृदुला सिन्हा यांचं निधन

Live Update News

गोव्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेत्या मृदुला सिन्हा यांचं निधन झाले आहे. मृदुला सिन्हा याच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे.


घाटकोपर अंधेरी वर्सोवा ही मुंबई मेट्रो १ ची सेवा आज तांत्रिक बिघाडामुळे खोळंबली होती. पण दीड तासांनंतर खोळंबलेली मेट्रोसेवा सुरळीत सुरू झाली आहे.


राम कदमांच्या भेटीसाठी नारायण राणे, नितेश राणे खार पोलीस स्टेशनात पोहोचले आहेत.

नक्की काय झाले वाचा 

‘जनआक्रोश’ आंदोलनापूर्वीच राम कदम पोलिसांच्या ताब्यात


देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ६१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४७२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ८९ लाख १२ हजार ९०८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३० हजार ९९३ जणांचा मृत्यू झाला असून ८३ लाख ३५ हजार ११० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४ लाख ४६ हजार ४०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


देशात १७ नोव्हेंबरपर्यंत १२ कोटी ७४ लाख ८० हजार १८६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात ९ लाख ३७ हजार २७९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

 


जगात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. त्याचप्रमाणे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात ५ कोटी ५९ लाख ४० हजारांहून अधिक जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी १३ लाख ४३ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले असून ३ कोटी ८९ लाख ६० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.