घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ८२ हजार पार!

Live Update: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ८२ हजार पार!

Subscribe

मागील २४ तासांत मुंबईत ९४० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ८२ हजार ८१४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार ७९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ५५ हजार ८६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात २४ तासांत ५ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ४ हजार ३६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा १८ लाख २० हजार ५९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९० हजार ९९७ रुग्ण मृत्यूमुखी झाले असून १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

दिल्लीत आज ४ हजार ९०६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६ हजार ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ६६ हजार ६४८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९ हजार ६६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ लाख २२ हजार ४९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३५ हजार ९१वर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 


शेतकऱ्यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा प्रस्ताव नाकारला असून शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, बुराडी येथील निरंकारी मैदानात आंदोलन करणार नाहीत तर सिंघू बॉर्डवरच ठिय्या आंदोलन करतील. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून लेखी स्वरुपात चर्चेचे निमंत्रण मिळाले तरच चर्चा होईल असा पवित्राही त्यांनी घेतला आहे.


मराठा क्रांती मोर्चा ८ डिसेंबरपासून मातोश्रीसमोर उपोषण करणार आहे. मराठा जागृती रथयात्रेला परवानगी नाकारल्यानंतर क्रांती मोर्चाने घोषणा केली आहे. कोपर्डीतील पीडित मुलीच्या आईवडीलांसह समन्वयक उपोषण करणार आहेत. औरंगाबादेत मशाल पेटवून उपोषणाची घोषणा केली.


मराठा आरक्षणासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत ज्येष्ठ नेत्यांवर टीकेची तोफ डागली आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा या भूमिकेतून आज मुद्दे मांडणार आहे. किती दिवस मराठा समाजाचा अंत पाहणार आहात. मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचारा का केला नाही?, असा सवाल उदयनराजेंनी विचारला आहे.


छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ पुन्हा एकदा कोब्रा २०६ बटालियनच्या जवानांना लक्ष्य केले आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे सात जवान जखमी झाले आहेत. यातील काही जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचवेळी या हल्ल्यात सीआरपीएफचे सहायक कमांडेंट नितीन भालेराव  हे शहीद झाले आहेत. नितीन भालेराव हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी होते. शहीद नितीन भालेराव यांचे पार्थिव रायपूर वरून विमानाने मुंबई येथे आणले जाईल व तिथून ते नाशिक येथे आणले जाईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामात केला जाईल, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.


दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणून देणं हे दुर्देवी आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. कृषी कायद्यांविरोधात सध्या पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आक्रमक झाले असून दिल्लीच्या सीमेवर त्यांना रोखण्यात आलं असून इथे गेल्या चार दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत.


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानीवरी जवळ कारला अपघात झाला असून प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. आस्था चॅनलच्या आदर्श तिवारी यांच्या कारला अपघात झाला आहे. हरिद्वारहून मुंबईकडे जाताना अपघत झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


येत्या दोन आठवड्यांत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -