Live Update: देशात काल दिवसभरात झाल्या ११ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या

Live Update News

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला दुपारी १.३० वाजता संबोधित करणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहे.


देशात ७ नोव्हेंबरपर्यंत ११ कोटी ७७ लाख ३६ हजार ७९१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात ११ लाख ९४ हजार ४८७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ६७४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशीतल कोरोनाबाधितांची संख्या ८५ लाख ७ हजार ७५४ इतकी झाली असून आतापर्यंत यापैकी १ लाख २६ हजार १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशातील ४९ हजार ८२ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. यामुळे देशातील रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या ७८ लाख ६८ हजार ९६८ पोहोचली आहे असून सध्या ५ लाख १२ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरिस यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या मूळ गावी थुलसेंद्रपुरमधील महिलांनी रांगोळी काढून अभिनंदन केले.


शनिवारी दिवसभरात राज्यात ३,९५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,१४,२७३ झाली आहे. राज्यात ९९,१५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, ४५,११५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा