घरताज्या घडामोडीLive Update: मुंबई २४ तासांत आढळले १,६०९ नवे रुग्ण, ४८ जणांचा मृत्यू!

Live Update: मुंबई २४ तासांत आढळले १,६०९ नवे रुग्ण, ४८ जणांचा मृत्यू!

Subscribe

मागील २४ तासांत मुंबई १ हजार ६०९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ४५ हजार ८७१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९ हजार ८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात मुंबईतील ८९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत २ लाख १५ हजार २६९ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. सध्या मुंबईत १९ हजार २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १४२ नवे कोरोनाबाधित आढळले असून १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख १७ हजार ६५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हार ६३३ जणांचा मृत्यू झाला असून १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तसेच सध्या १ लाख ५८ हजार ८५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा 

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलीस सोमवारी चौकशीसाठी बोलावणार असल्याचे समोर येत आहे.


पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मेफेड्रॉन औषधाची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या बायोटेक कंपनीला सील केले असून नायजेरियन नागरिकांसहर आणखी ३ जणांना अटक केली आहे. आतापर्यंत एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे. २० कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि रोख जप्त केले आहे.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिलेने केलेल्या छळाच्या चुकीच्या आरोपावरून माझ्याविरोधात एफआयआर नोंदविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. नंतर हे प्रकरण मागे घेण्यात येईल असे ते म्हणाले. माझ्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली गेली होती. मला भाजपमध्ये खूप त्रास झाला, असे एकनाथ खडसे म्हणाले.


भाजपाला राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पुन्हा एकदा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असून आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत. यासह भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. (सविस्तर वाचा)


गेल्या ३ ते साडेतीन दशकं भाजपचं नेतृत्व करणारे आणि भाजपची वाढ करण्यासाठी मुंडेंसोबत अनेक वर्ष काम करणारे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्याचं मला सांगितलं आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यामुळे बळ वाढणार आहे. अनेक वर्षांचा अनुभव असलेला नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहे. आज एकनाथ खडसेंचा प्रवेश होणार आहे. भाजपमध्ये त्यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून जो अन्याय होत आहे, तो महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्यांनी मला भाजपचा त्याग करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत.


महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलात आतापर्यंत बाधितांचा आकडा २५ हजारांवर पोहोचला आहे. त्यापैकी १,८०९ पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर २७० जणांचा कोरोनामुळे बळी घेतला आहे.


मंगळवारी कोरोना बाधितांच्या दैनंदिन रूग्णामध्ये घट झाल्यानंतर बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, नव्याने आलेल्या बाधितांच्या तुलनेत अद्याप बरे होणार्‍या लोकांची संख्या जास्त आहे, ज्यामुळे कोरोनाची अॅक्टिव्ह रूग्ण सातत्याने कमी होत आहेत. (सविस्तर वाचा)


Police Commemoration Day 2020 दिवसानिमित्त कर्तव्य बजावत असताना आपला जीव गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानवंदना दिली आहे. मुंबई येथील नायगाव पोलीस मुख्यालयात आज मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५ टक्क्यांवर

राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार १५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ९ हजार ५१६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.तसेच आज ७ हजार ४२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकू १३ लाख ९२ हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५ टक्के एवढा झाला आहे. (सविस्तर वाचा)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये हाताशी आलेली पिकं खराब झाली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदील झाला आहे. त्याला धीर देण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर आज बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधतील. (सविस्तर वाचा)


धुळे-सूरत महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, 35 जण गंभीर

नंदूरबार जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळून त्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज, बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स गाडी दरीत कोसळली. धुळे – सूरत नॅशनल हायवेवर कोंडाबाई घाटात हा भीषण अपघात घडला. ही ट्रॅव्हल्स जळगावहून सूरतकडे जात असताना कोंडाबाई घाटातील दर्ग्याजवळ पूलावरून थेट 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळली. (सविस्तर वाचा)


आज राज्य सरकार आणि रेल्वेची बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल ट्रेन सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा देणारे सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान सर्वसामान्यांना लोकलने कधी प्रवास करता येईल, हे अद्याप स्पष्ट झाले नसून त्यावर कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित असलेली रेल्वे प्रवास सेवा लवकरच सर्वसामान्यांनाही मिळण्याचे संकेत आहेत. या संदर्भात आज रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात आज महत्वाची बैठक होणार आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -