घरCORONA UPDATELive Update: CSK v/s RCB : चैन्नई पुन्हा पराभूत; बंगळुरूचा दमदार विजय

Live Update: CSK v/s RCB : चैन्नई पुन्हा पराभूत; बंगळुरूचा दमदार विजय

Subscribe

जाणून घ्या, दिवसभरातील लाईव्ह अपडेट

आयपीएल सामन्यातील चैन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंज बंगळुरू यांच्यातील लढतीत बंगळुरू संघाने विजय मिळवला आहे.

- Advertisement -

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (सीबीआय) हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी हाती घेतली आहे.

- Advertisement -

राज्यात ११,४१६ नवे रुग्ण, ३०८ जणांचा मृत्यू

राज्यात ११,४१६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,१७,४३४ झाली आहे. राज्यात २,२१,१५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३०८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ४० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


जम्मूतील दादूरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.दादूरा हा भाग पुलवामात येतो. या भागात आता शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीतील भाजप मुख्यालयात दाखल झाले असून बिहारमधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात येथे बैठक होणार असल्याचे समजते.


पुणे शहराला शनिवारी दुपारी अवकाळी मुसळधार पावसाने झोडपले.शहरातील कोथरूड, कर्वेनगर,वारजे, कात्रज, पाषाण, सिंहगड रस्ता आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. गेले दोन दिवस पुणे शहरात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. परंतु, शनिवारी दुपारी अचानक आभाळ भरून आले. त्यानंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. साधारण अर्धा सुरु राहिल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.


राज्यात कोरोना कहर सुरू असून महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या २४ तासांत १२७ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८६२ जणांना पोलीस दलात कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २२ हजारांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ हजार ३०३ जणांवर उपचार सुरू आहेत.


लॉकडाऊननंतर मुंबईतील मूर्तीकारांवर मूर्ती विक्रीचे संकट


खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन. गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज सकाळी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोरे यांच्यावर सुरुवातीला पिंपरी चिंचवडच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. पण दहा दिवसांपूर्वी तब्येत खालावल्यामुळं त्यांना रुबीत हलविण्यात आलं होतं. आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.


देशात ७३ हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतय आहे. यासह दिलासादायक म्हणजे कोरोना संसर्गातून बरे होणार्‍या लोकांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७३ हजार २७२ नवीन रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ६९ लाखांचा टप्पा पार केला केला असून तो सध्या ६९ लाख ७९ हजार ४२४ वर पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)


जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिंगम भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. यानंतर जवानांनी एम-४ रायफल आणि एक पिस्तुल हस्तगत केले. जवानांकडून या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.


देशात काल दिवसभरात ११ लाख ६४ हजार ०१८ नमुन्यांची चाचण्या करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात ८ कोटी ५७ लाख ९८ हजार ६९८ जणांच्या कोरोनाच्या चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जयजित सिंग एटीएस प्रमुख; देवेन भारती सुरक्षा महामंडळावर

मुंबईसह राज्य पोलीस दलात शुक्रवारी रात्री २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून देवेन भारती यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर तर जयजित सिंग यांना दहशतवार विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख नेमण्यात आले आहे. तसेच प्रभात कुमार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तर नवल बजाज यांना आर्थिक गुन्हे शाखेत अप्पर पोलीस महासंचालक म्हणून पाठवण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईत आज कोरोनाचे २ हजार २८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख २५ हजार ०४८ वर पोहचली आहे. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ३४० वर पोहचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ३४७ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८९ हजार ०२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -