घरताज्या घडामोडीLive Update: समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना कोरोना

Live Update: समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना कोरोना

Subscribe

राज्यात हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी हाहाकार केला आहे. पुणे, सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपल्याने जिल्ह्यात पाणीच पाणी साठले असून नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचं पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर इथे महामार्गाववर आलं असल्याने सोलापूर हायवेवरची वाहतूक थांबवली आहे. पुणे शहर आणि उपनगरांतही पावसाचा जोर कायम असल्याने रात्री उशीरा मुठा नदीपात्रातही पाणी सोडण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

पुण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरण भरले आहे. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याची पातळी वाढल्याने सोलापूर जिल्ह्यात धोका निर्माण झाला आहे. उजनीतून होणारा विसर्ग 200,000 क्यूसेक्सपर्यंत वाढवण्यात आला आहे. पुण्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे.

- Advertisement -

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना कोरोनाचा संसर्ग

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. समाजवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. बुधवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मुलायम सिंह यादव यांच्या पत्नीची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे.


मुंबईत दिवसभऱात आज २ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत आज कोरोनाचे २ हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३४ हजार ६०६ वर पोहचली आहे. तर ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ५५२ वर पोहचला आहे. (सविस्तर वाचा)


उद्यापासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय ट्रेन्सची संख्या वाढणार

उद्यापासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवांची संख्या 453 वरुन 481 ने वाढवणार आहे


राज्यात १,९६,२८८ कोरोना बाधितांवर उपचार सुरू

राज्यात १०,५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,५४,३८९ झाली आहे. राज्यात १,९६,२८८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४०,८५९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


वसईत आज १२ जणांचा कोरोनाने मृत्यू

वसई विरारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बुधवारी १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५२२ वर पोचला आहे.  बुधवारी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील नालासोपारातील ८ जण आहेत. विरारमध्ये ३ आणि वसईत एकाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसात कोरोनामुळे ३६ जण दगावले आहेत. त्यात विरारमधील १४, नालासोपारातील १३, वसईतील ८ आणि नायगावमधील एकाचा समावेश आहे. मृतांची वाढती संख्या वसईकरांची चिंता वाढवणारी आहे.


महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत पोलीस दलातील ९८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून एकाचा बळी गेल्याची माहिती आहे. आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलात २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत २६३ जणांचे प्राण कोरोनामुळे गेले आहे.


जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी एसआयटीमार्फत होणार आहे. जलयुक्त शिवार योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम योजना होती. कॅगने या योजनेवर ताशेरे ओढले होते, त्या अनुषंगाने चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई मेट्रोची सेवा येत्या १९ ऑक्टोबरपासून प्रवाशांसाठी सुरू होणार

राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर करून मुंबई मेट्रो १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई मेट्रो प्रशासनानं १९ ऑक्टोबरपासून मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोनं हा निर्णय घेतला आहे.


राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत बंदच राहतील


मेट्रो, ग्रंथालये उद्यापासून सुरू, राज्य सरकारची नियमावली जाहीर

महाराष्ट्र मिशन बिगन अगेनच्या दिशेने वाटचाल करत असताना आणखी एक आनंदाची बातमी नागरिकांसाठी राज्य सरकारने दिली आहे. राज्यात गुरूवार, उद्यापासून ग्रंथालये सुरू करण्यात ठाकरे सरकारने परवानगी दिली असून नुकतेच सरकारने यासंबंधीचे नवे आदेश जारी केले आहे. (सविस्तर वाचा)


काल रात्रीपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे.


सोलापुरात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राष्ट्रीय महामार्गवर पाणी साचले आहे. त्यामुळे सोलापूर-धुळे वाहतूक थांबली आहे. अक्कलकोट तालुक्यात घोळसगाव किरनळी ओढा दुथडी भरुन वाहत आहे. बोरगाव-बादोले, घोळसगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचलं आहे.


अभिनेता रिचा चड्ढा हिचा मुंबई उच्च न्यायालयात पायल घोष विरोधातील मानहानीचा खटला मागे घेण्यात आला.


महाराष्ट्र- शिर्डी साई बाबा मंदिराच्या बाहेरील दुकानदारांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने धार्मिक स्थळे न उघडण्याच्या निर्णयामुळे त्यांचे नुकसान होत आहे.


देशात गेल्या २४ तासांत ६३ हजार ५०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७२ लाख ३९ हजार ३९० पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख १० हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६३ लाख १ हजार ९२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ८ लाख २६ हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


आज दुपारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नावांचा प्रस्ताव बैठकीत येण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस प्रत्येकी चार सदस्यांची नाव देणार आहे. राष्ट्रवादीच्या यादीत खडसेंच्या नावाची वर्णी लागणार का? या चर्चांना सध्या उधाण आलं आहे.


संपूर्ण जगात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्याप्रमाणे मृत्यूचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. वर्ल्डमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनग्रस्तांची संख्या ३ कोटी ८३ लाखांहून अधिक असून यापैकी आतापर्यंत १० लाख ९० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या २ कोटी ८८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


मंगळवारी दिवसभरात राज्यात ८,५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,४३,८३७ झाली आहे. राज्यात २,०५,४१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी १८७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ७०१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -