Live Update: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया कोरोना पॉझिटिव्ह

News Live Update
ताज्या बातम्यांचे लाईव्ह आपडेट

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. आज सोमवारी मुंबईत दिवसभरात २ हजार २५६ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१ हजार ९४९ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ३१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत एकूण ८ हजार १७८ जणांना मृत्यू झाला आहे. तर २४ तासात १,४३१ बरे झालेल्या रुग्णांची संख्या असून आतापर्यंत एकूण १,३२,३४९ रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ७७ टक्के इतका झाला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसाला १५ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १७ हजार ०६६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १५ हजार ७८९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. मात्र, कोरोनावर मात करुन देखील अनेक जण पुन्हा बाधित होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती चिखलीकरांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीद याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून ही शिक्षा दिल्ली करकरडोमा कोर्टाने सुनावली आहे.


आयसीएमआरने संसदेतील साधारण २ हजार ५०० हून अधिक लोकांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेतले असल्याची माहिती एएनआयने ट्विट करत दिली आहे.


राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएनच्या हरिवंश नारायण सिंह यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. ते दुसऱ्यांदा या पदासाठी निवडले गेले आहेत.


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेच्या कामजात ३५९ सदस्यांनी हजेरी लावली होती.

 


राज्यात गेल्या २४ तासांत ३११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा पोलिसांचा आकडा १९ हजार ३८५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १९४ बाधित पोलिसांचा मृत्यू झाला असून १५ हजार ५२१ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ हजार ६७० बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत, असे राज्यातील पोलीस दलाने सांगितले आहे.


महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ४ खासदारांना कोरोना लागण झाल्याचे समोर येत आहे.


सध्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनामुळे एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. सामनाचे वरिष्ठ पत्रकार राहुले डोलारे यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून त्यांच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते.


आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘देशातील सर्वात मोठे आव्हान हे राज्यातील अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीचे आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी आपण संसदेत अर्थव्यवस्थेची स्थिती, कोरोना आणि बेरोजगारीची आव्हाने यासंदर्भात चर्चा केली पाहिजे’, असे मला वाटत आहे.

 


देशात २४ तासांत ९२ हजार ७१ नवे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७९ हजार ७२२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३७ लाख ८० हजार १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


सभागृह एक तासासाठी तहकूब करण्यात आले.


एलएसीवरील तणाव, चीनच्या हेरगिरी या पार्श्वभूमीवर स्थगन प्रस्तावाची नोटीस काँग्रेसकडून लोकसभेत देण्यात आली आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्तावाची नोटीस देण्यात आली आहे. सविस्तर वाचा 


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.


देशभरात कोरोनाचे संकट असताना आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाले आहेत.


जगातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. आता जगातील कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटीच्या उंबरठ्यावर आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात २ कोटी ९१ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी आतापर्यंत ९ लाख २८ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ कोटी १० लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिका, भारत, ब्राझील आणि रशिया यांसारख्या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान महाराष्ट्र कोरोनाबाधितांची संख्येत येत्या काही दिवसात रशिया देखील मागे टाकले. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असून आतापर्यंत १० लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.


राज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात दिवसाला २० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसत आहे. रविवारी राज्यात २२ हजार ५४३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २९ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी ११ हजार ५४९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७० टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा