घरताज्या घडामोडीLive Update: वांद्रे, पाली हिल, जुहू, खार, अंधेरीत ड्रग्ज रॅकेटवर NCBची कारवाई

Live Update: वांद्रे, पाली हिल, जुहू, खार, अंधेरीत ड्रग्ज रॅकेटवर NCBची कारवाई

Subscribe

KXIP vs RCB: राहुल-गेलचं वादळ; पंजाबची पराभवाची मालिका खंडित

किंग्ज इलेव्हन पंजाबने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ८ गडी राखून पराभूत केलं. या विजयाने पंजाबने पराभवाची मालिका खंडित केली आहे. बँगलोरच्या १७२ धावांचं आव्हान पंजाबने सहज पार केलं. मयांक अगरवाल, ख्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या फलंदाजीच्या जोरावर बँगलोरला हरवलं. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

वांद्रे, पाली हिल, जुहू, खार आणि अंधेरी उच्चभ्रू भागात ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथका (एनसीबी) नं मुंबईत मोठी कारवाई करत ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला. मुंबईतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच अनेक ड्रग्ज डीलरला अटक करण्यात आली आहे.


नाणार जमीन व्यवहाराप्रकरणी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांचे चौकशीचे निर्देश

- Advertisement -

रत्नागिरीतील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प परिसरात कवडीमोल किमतीत खरेदी करण्यात आलेल्या जमीन विक्रीची रत्नागिरी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात एक चौकशी समिती नेमण्यात आली असून, या समितीकरवी या खरेदी-विक्री व्यावहाच्या चौकशी करण्याचे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. हा चौकशी अहवाल महिन्याभरात सादर करण्याच्या सूचनाही पटोले यांनी दिल्या आहेत. नाणारच्या कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन या जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दीर्घकाळ बैठक पार पडल्यावर विधानसभा अध्यक्षांनी चौकशीचे हे निर्देश दिले. (सविस्तर वाचा)


मुंबई महापालिकेच्या हद्दीत ९.३० पर्यंत दुकाने तर ११.३० पर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यास मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी परवानगी दिली आहे. त्यासंबंधीचे पत्रक त्यांनी जारी केले आहे.


Corona In Maharashtra: आज १३,७१४ रुग्णांना डिस्चार्ज; ३३७ जणांचा बळी

गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार २६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४१ हजार १९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. तसेच आज १३,७१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण १३,३०,४८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५. ०४ % एवढे झाले आहे. (सविस्तर वाचा)


मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरपरिस्थितीमुळे तेलंगणात आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.


मुंबईतील धारावी परिसरातून अ‍ॅन्टी नारकोटिक्स सेलने काल एका ४७ वर्षिय ड्रग पेडलरला अटक केली आहे.


महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटकात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या मदतीसाठी या तिनही राज्यांमध्ये एनडीआरएफच्या १०९ टीम दाखल झाल्या आहेत.


भारतासाठी पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या ठरलेल्या भानू अथैय्या यांचे निधन झाले आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथैय्या यांना १९८३ साली ‘गांधी’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. वेषभूषाकार भानू अथैय्या यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाल्याची बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.


धारावीत आज १५ नव्या रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत ३ हजार ३७४ कोरोनाबाधित या परिसरात आढळून आले आहेत. यातील १५४ सक्रिय केसेस असून यातील २ हजार ९१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.


काही दिवसांपूर्वी गटात पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या घाटकोपरमध्ये आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यामुळे आता किरीटी सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करा, अशी किरीट सोमय्या मागणी करत होते.


देशात गेल्या २४ तासांत ६७ हजार ७९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७३ लाख ७ हजार ९८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ११  हजार २६६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६३ लाख ८३ हजार ४४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ८ लाख १२ हजार ३९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


देशात बुधवारी दिवसभरात ११ लाख ३६ हजार १८३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे १४ तारखेपर्यंत देशातील एकूण नमुन्या चाचण्यांची संख्या ९ कोटी १२ लाख २६ हजार ३०५वर पोहोचली आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


पावसामुळे पुणे विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचं सुधारित वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जाहीर होणार आहे.


जगातील कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरं होण्याचं प्रमाण देखील तितकच वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ८७ लाखांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १० लाख ९६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून २ कोटी ९१ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


बुधवारी राज्यात १०,५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,५४,३८९ झाली आहे. राज्यात १,९६,२८८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४०,८५९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -