Live Update: खासदार राहुल गांधी वायनाडला १९ तारखेपासून दोन दिवसिय दौऱ्यावर

Live Update News

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी वायनाड या आपल्या मतदारसंघात १९ ऑक्टोबर, सोमवारपासून दोन दिवसिय दौऱ्यावर जाणार आहेत.


रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने KKR चा ८ गडी राखून पराभव करत विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. सलामीवीर क्विंटन डिकॉच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने कोलकाताच १४९ धावांचं आव्हान सहज पार केलं. या विजयासह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)


मुंबई गुन्हे शाखा (प्रकटीकरण) पदी प्रकाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली असून परिमंडळ ४ पोलीस उपायुक्त विजय पाटील यांना नियुक्त करण्यात आले आहे. परिमंडळ ६ पोलीस उपायुक्त पदी कृष्णकांत उपाध्याय तर परिमंडळ १० मध्ये एम सी व्ही महेश पाटील तर गुन्हे शाखा अंमलबजावणी डॉ.राजू भुजबळ, पोलीस उपायुक्त एस चैतन्य यांच्याकडे (अभियान), योगेश कुमार गुप्ता (वाहतूक),संजय पाटील (मुख्यालय २), एस. टी. राठोड (विशेष शाखा १), भरत तांगडे (जलद प्रतिसाद पथक QRT), विनायक ढाकणे (ताडदेव सशस्त्र विभाग)


केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल हॉस्पिटलमध्ये दाखल होत असून याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. पियुष गोयल यांना किडनी स्टोनचा त्रास होत असून यावर उपचार घेण्याकरता ते हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


थांबा होsss! महिलांच्या लोकल प्रवासाचं अजून ठरलं नाही!

घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांना मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करू देण्यासाठी राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर उद्यापासूनच महिलांना लोकल प्रवास करता येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर आता मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला उत्तर दिलं आहे. लोकल रेल्वेमधून प्रवास सुरू करण्यासाठी त्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महिला प्रवाशांना परवानगी दिल्यास किती गोष्टींवरचा ताण वाढू शकतो, त्यासाठी काय तजवीज करावी लागू शकते, यासंदर्भात एकत्र बसून चर्चा करण्यासाठी रेल्वेने राज्य सरकारला आमंत्रित केलं आहे. त्या चर्चेमध्ये होणाऱ्या निर्णयानंतरच नक्की कधीपर्यंत महिलांना प्रवासाची परवानगी दिली जाऊ शकते, याबाबत सांगता येईल, असं उत्तर रेल्वेने राज्य सरकारला पत्र पाठवून दिलं आहे. (सविस्तर वाचा)


एस आणि टी प्रभाग समितीत भाजपला मोठा झटका; संख्याबळ असूनही सेनेकडे अध्यक्षपद!

एस आणि टी ही प्रभाग समिती आतापर्यंत भाजपच्या ताब्यात होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सेनेला जाऊन मिळाल्याने या प्रभागात दोघांचे संख्याबळ समसमान झाले. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल चिठ्ठीवर ठरणार असे स्पष्ट असतानाच भाजपचे एक मत अवैध ठरले आणि नशिबावर अवलंबून असलेला हा विजय सेनेने सरळसरळ आपल्या बाजूने झुकवून देत भाजपला मोठा दणका दिला आहे. हा विजय मिळवत पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपला गनिमी कावा यशस्वी केला. पण याबरोबरच त्यांनी भाजपचे खासदार मनोज कोटक आणि महापलिका गटनेते प्रभाकर शिंदे यांना मोठा झटका दिला. (सविस्तर वाचा)

एस व टी प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या दिपमाला बढे यांची निवड

राज्यात ११,४४७ नवे रुग्ण, ३०६ जणांचा मृत्यू

राज्यात ११,४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १५,७६,०६२ झाली आहे. राज्यात १,८९,७१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३०६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४१५०२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)


आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरोधात कोलकाता नाईट रायडर्सची मॅच असून कोलकाताने टॉस जिंकत प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला आहे.


नवरात्रौत्सवाची सुरूवात राज्य सरकारने आनंदाची बातमी देऊन केली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने सर्व महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. याबाबतचे पत्रक राज्य सरकारने जारी केले असून यामध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र अनलॉकच्या प्रक्रियेनंतर ती सुरू करण्यात आली. पंरतू ठरावीक कर्मचारी वर्गांनाचा ही सेवा उपलब्ध होती. मात्र नवरात्री सणाच्या निमित्ताने सरकारने सर्व महिलांसाठी मोठी भेट देत ही सेवा घेण्यास परवानगी दिली आहे. (सविस्तर वाचा)


काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वारंटाइन आहे. मागील काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


बेंगळुरू पोलीस येथे विवेक ऑबेरॉय आणि चित्रपट निर्माते संदिप सिंह यांच्या ड्रग कनेक्शनच्या चौकशीसाठी दाखल झाले आहेत. परंतु एनसीबी या प्रकरणी तपास करत नाही. आम्ही एनसीबीला अमली पदार्थांच्या कनेक्शनची चौकशी करण्याची विनंती करणार आहोत. मात्र जर तसे झाले नाही तर मुंबई पोलीस यासंबंधी चौकशी करतील, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयला दिली.


नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ३ ते ४ राफेल लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सामील होणार असल्याचे समोर येत आहे.


भाजप नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यभर रामलीला साजरी करण्याची परवानगी मागितली.


जळगावमध्ये एका कुटुंबातील ४ अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर येत आहे. ४ अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली आहे. रावेर तालुक्यात बोरखेडा गावातील शेतशिवारात ही घटना घडली आहे. या हत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.


काश्मीरच्या बडगाममधून बेपत्ता झालेल्या एसएसबी जवानाला राजौरी जिल्ह्यात अटक केली आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.


देशात गुरुवारी दिवसभरात १० लाख २८ हजार ६२२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. देशात १५ ऑक्टोबरमध्ये एकूण ९ कोटी २२ लाख ५४ हजार ९२७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कुमार सानू यांचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांना त्यांना कोरोना झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे.


गेल्या २४ तासांत देशात ६३ हजार ३७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८९५ रुग्णांच्या मृत्यूची नोद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ७३ लाख ७० हजार ४६९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख १२ हजार १६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ५३ हजार ७८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ८ लाख ४ हजार ५२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


जगात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. जगात आतापर्यंत ११ लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, ३ कोटी ९ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण जगभरात आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत २ कोटी ९३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ११ लाख २ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


गुरुवारी दिवसभरात राज्यात १० हजार २६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख ६४ हजार ६१५ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४१ हजार १९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. तसेच गुरुवारी १३,७१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण १३,३०,४८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५. ०४ % एवढे झाले आहे. सविस्तर वाचा