घरताज्या घडामोडीLive Update: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Live Update: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Subscribe

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

‘कोविड१९ चे निदान झाल्यामुळे मी गेल्या सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वादाने मला कमीतकमी वेळेत डिस्चार्ज मिळाला असून मी आज सुखरूप घरी परतलो’, असे अनिल परब म्हणाले.

- Advertisement -


जळगावच्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणातली धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोठ्या भावाच्या मित्रांनी ४ भावंडांच्यी हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत.

१९ ऑक्टोबरला ते बारामतीपासून आपला दौऱ्या सुरुवात करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी २० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी २१ रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.


पुण्यातील जनता वसाहतीत शुक्रवारी रात्री पाण्याच्या पाइपलाईन फुटल्यामुळे आठ जण जखमी झाले आहे. यामधील  दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.


देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार २१२ नवे रुग्ण आढळले असून ८३७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ७४ लाख ३२ हजार ६८१वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख १२ हजार ९९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६५ लाख २४ हजार ५९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ७ लाख ९५ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. तसेच रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटर आकडेवारीनुसार, ३ कोटी ९५ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण जगात आढळले आहे. यापैकी आतापर्यंत ११ लाख ९ हजारांहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच २ कोटी ९६ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


शुक्रवारी दिवसभरात राज्यात ११,४४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १५,७६,०६२ झाली आहे. राज्यात १,८९,७१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात शुक्रवारी ३०६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४१५०२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -