घरताज्या घडामोडीLive Update: राज्य सरकार मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला देणार आव्हान

Live Update: राज्य सरकार मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला देणार आव्हान

Subscribe

जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मानकोटे सेक्टरमध्ये पाकिस्तानचे सैनिकांकडून नियंत्रण रेषेत लहान शस्त्र तसेच तोफांच्या सहाय्याने गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती एएनआयने ट्विट करून दिली आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

राज्य सरकार मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणारी याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

राज्यसभेचे खासदार आणि कर्नाटक भाजप नेते अशोक गस्ती यांचे आज, गुरुवारी बेंगळुरू येथे कोरोनाने निधन झाले. त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना २ सप्टेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे भाजप नेते अशोक गस्ती यांनी यावर्षी २२ जुलैला राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली होती.


अनलॉक ४ नंतर मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मध्यरात्रीपासून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अमित शहा यांना एम्समध्ये दाखल केले होते.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम उद्या, १८ सप्टेंबर रोजी इंदू मिल इथे होणार आहे. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम झाला होता. मात्र आता महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे.


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी नरेंद्र मोदींना ७० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला.


राज्यात गेल्या २४ तासांत ३६४ कोरोनाबाधित पोलीस आढळले असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २० हजार ३६७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २०८ पोलिसांचा मृत्यू झाला असून १६ हजार ३६३ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ हजार ७९६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्यातील पोलीस दलाने दिली आहे.

 


मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक महापालिकेने मास्क न घालणाऱ्यावरती कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावणार आहे. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यावर देखील ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.


देशात गेल्या २४ तासांत ९७ हजार ८९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार १३२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५१ लाख १८ हजार २५४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ८३ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४० लाख २५ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या १० लाख ९ हजार ९७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.


जेएनपीटीच्या खासगीकरणाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत विरोध दर्शविला आहे. जेएनपीटीचे खासगीकरण करून नका, असे मागणी करणारे निवेदन संजय राऊत यांनी राज्यसभेत सादर केले.


देशात १५ सप्टेंबरपर्यंत ६ कोटी ५ लाख ६५ हजार ७२८ नमुन्यांच्या झाल्या आहेत. यापैकी ११ लाख ३६ हजार ६१३ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत जगात ३ कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३ कोटीहून अधिक असून यापैकी आतापर्यंत ९ लाख ४४ हजारांहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच २ कोटी १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. संपूर्ण जगात अमेरिका, भारत, ब्राझील, रशिया या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतात बुधवारी कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.


राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांच्या पार

राज्यात २३ हजार ३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख २१ हजार २२१ झाली आहे. राज्यात २ लाख ९७ हजार १२५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४७४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ३० हजार ८८३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७५ टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -