घरदेश-विदेशपंजाबमध्ये भयानक दुर्घटना; रेल्वेने ६० पेक्षा अधिक नागरिकांना चिरडले

पंजाबमध्ये भयानक दुर्घटना; रेल्वेने ६० पेक्षा अधिक नागरिकांना चिरडले

Subscribe

पंजाबमध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठी धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून रावण दहनाचा कार्यक्रम पाहणाऱ्या ५० जणांना रेल्वेने चिरडले आहे.

पंजाबमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. रावण दहनाचा कार्यक्रम रुळावर उभं राहून पाहणाऱ्या लोकांना रेल्वेने चिरडले. अमृतसरच्या चौरा बाजारमध्ये रावण दहन कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये ६० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना ताबडतोब अमृतसरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत आणि जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. घटनाचा व्हिडिओ समोर आला आहे.

- Advertisement -

रावण दहनाचा कार्यक्रम पाहत होते

दसऱ्याच्या मूहूर्तावर पंजाबच्या अमृतसरमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम सुरु होता. रेल्वे ट्रॅकच्या शेजारीच रावण दहनाचा कार्यक्रम सुरु होतो. रावण दहनाचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिक रेल्वे रुळाजवळ उभे होते. दरम्यान रावण दहन करण्यात आले फटाके वाजण्यास सुरुवात झाल्याने सर्व नागरिक पळू लागले. या ठिकाणावरुन आलेल्या ट्रेनचा आवाज आला नाही आणि समोरुन येणाऱ्या रेल्वेने अनेक नागरिकांना चिरडले.

- Advertisement -

५० ते ६० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू 

पठाणकोटवरुन अमृतसरला जाणाऱ्या रेल्वेने रेल्वे ट्रॅकवर उभे असलेल्या नागरिकांना चिरडले. आतापर्यंत ५० ते ६० पेक्षा अधिक नागिरकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर अमृतसरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

घटनेचा व्हिडिओ आला समोर 

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो याच घटनेचाच असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये रावण दहनादरम्यान समोरुन एक रेल्वे जाताना दिसत आहे. मात्र ही मोठी रेल्वे नसून या रेल्वेला फक्त दोन ते तीन डबे असल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय या रेल्वेच्या डब्याचा रंग वेगवेगळा असल्याचे दिसत आहे.

मृतकांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत जाहीर

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अमृतसर अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना मोफत उपचार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी प्रशासनाला युध्दपातीवर मदत करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या मुख्यमंत्री अमरिंदर सिंह अमृतसर जाऊन घटनास्थळावर भेट देणार आहेत.

नवज्योतसिंग सिध्दूंची पत्नी उपस्थित होती

घटनास्थळावरु असलेल्या प्रत्यक्षदर्शिंनी असे सांगितले आहे की, काँग्रेसने या रावन दहन कार्यक्रमाचा आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शिनी केला आहे. तसंच या कार्यक्रमाला नवज्योतसिंग सिध्दू यांची पत्नी नवजोत कौर प्रमुख पाहुण्या होत्या आणि त्यावेळी त्यांचे भाषण सुरु होते.

गृहमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केले आहे. पंजाब रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या दु:खाला शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. मृतकांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. राजनाथ सिंह यांनी पंजाबच्या गृहखाते आणि डीजीपींशी फोनवरुन घटनेविषयी चर्चा केली. या दु:खाच्या प्रसंगी केंद्रसरकार मदत करण्यासाठी तयार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी ट्विटरवरु व्यक्त केले दु:ख

अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना हृदयद्रावक आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. तर जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करतो. सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब मदत करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

नवज्योत कौर यांची प्रतिक्रिया

रेल्वे अपघाता दरम्यान नवज्योत कौर मंचावर उपस्थित असून त्यांचे भाषण सुरु असल्याचा प्रत्यक्षदर्शींनी आरोप केला होता. यावर नवज्योत कौर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रावणाचे दहन झाल्यानंतर मी घटनास्थळावरुन निघून केले होते तेव्हा ही घटना घडली. सध्या जखमींना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या कार्यक्रमाचे दरवर्षी याठिकाणी आयोजन केले जाते. या घटनेवरुन अनेक जण राजकारण करत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -