घरCORONA UPDATEलॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात होते ६०६ रुग्ण, तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या ९० हजार!

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात होते ६०६ रुग्ण, तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या ९० हजार!

Subscribe

कोरोनाच्या संकटापासून देशाला वाचवण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. आजपासून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. लॉकडाऊन ४ साठी नवीन गाईडलाईन्स प्रसिध्द केल्या आहेत. यासाठी केंद्राने नियमावली तयारी करण्याची जबाबदारी राज्यांवर दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. २५ मार्चपासून लागू केलेला लॉकडाउन २१ दिवसांचा होता. त्यानंतर लॉकडाउन २ जाहीर केला. त्याचा कालावधी ३ मे पर्यंत होता. त्यानंतर लॉकडाउन २ आठवड्यांसाठी वाढविण्यात आला. त्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ बघता पुन्हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला. काल लॉकडाऊन ३ चा शेवटचा दिवस होता. आजपासून लॉकडाऊन ४ ला सुरूवात झाली आहे.

लॉकडाउन १ आणि लॉकडाऊन ४ सुरू होण्यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करायला हवा. पहिल्या टप्प्याच्या सुरूवातीला ६०६ लोकांना (२५ मार्च पर्यंत) कोरोनाची लागण झाली होती, जी आता ९०,९२७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर कोरोना बरे होण्याऱ्या रूग्णांच्या संख्या बघितली तर पहिल्या टप्प्यात ते ७ टक्के आणि चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी ३७.५ टक्के आहे.

- Advertisement -

पण दररोज कोरोना रूग्णांच्या वाढत जाणाऱ्या संख्या बघता पहिल्या टप्प्यात ती १५ टक्के होती. आता ती ५.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लॉकडाऊन एक मध्ये २ जिल्ह्ये कोरोना बाधित होते. आता चोथ्या टप्प्यात जिल्ह्यांची संख्या ५५० वर पोहचली आहे.

लॉकडाऊन ४ साठी मार्गदर्शक सुचना

देशभरात लॉकडाऊन ४ च्या घोषणेनंतर गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. लॉकडाउन ४ मध्ये देशी आणि परदेशी विमानांना परवानगी देण्यात आलेली नाहीये. राज्यात हॉटस्पॉट क्षेत्रातील अटींमध्ये क्षितीलता देण्यात आलेली नाहीये. मेट्रो-सिनेमा हॉलवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व प्रकारची मंदिरे, प्रार्थना स्थळे बंद राहणार आहेत. राज्य सरकारने लाल, हिरवा, केशरी, आणि कंटेनमेंट झोन ठरवले आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Video – घरी पोहचण्यासाठी मजुराने केला ‘असा’ जुगाड की बघणारे आश्चर्यचकीत झाले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -