घरCORONA UPDATEUnlock 1: आता प्रवासासाठी ई पासची गरज नाही; केंद्राचे निर्देश

Unlock 1: आता प्रवासासाठी ई पासची गरज नाही; केंद्राचे निर्देश

Subscribe

कोरोना व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने आतापर्यंत चार वेळा लॉकाडाऊन घोषित केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाचव्या लॉकडाऊनची घोषणा जरी झाली असली तरी हा लॉकडाऊन फक्त कंटेनमेंट झोनसाठी लागू असणार आहे. कारण त्याबाहेरील ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट, सलून आणि धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी असणार आहे. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि राज्यातंर्गत प्रवासासाठी लागणारे ई पास देखील काढण्याची यापुढे गरज नसणार आहे. मात्र याबाबतचे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ज्यांना आपापल्या गावी जायचे आहे, त्यांच्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे आता लक्ष लागले आहे.

गृह मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकांना आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच राज्यांतर्गत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही परमिटची गरज लागणार नाही. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मात्र राज्य प्रवासावर निर्बंध लादू शकते. तो अधिकार राज्यांना दिला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापर्यंत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा झाल्यास डिएमची परवानगी घ्यावी लागत होती. तर राज्यांतर्गत प्रवासासाठी ऑनलाईन पास काढावा लागत होता किंवा जवळच्या पोलीस स्थानकातून सूची केलेले कारण सांगून पास मिळत होता. अत्यावश्यक सेवेतील प्रवासासाठी पासची आवश्यकता नव्हती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -