घरदेश-विदेशधक्कादायक! LockDown मुळे पार्लर व्यवसाय करणाऱ्या महिलेची आत्महत्या

धक्कादायक! LockDown मुळे पार्लर व्यवसाय करणाऱ्या महिलेची आत्महत्या

Subscribe

कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसायांना खिळ बसली. अशातच ऐन लग्नसराईच्या काळात लॉकडाऊन आाल्याने पार्लर व्यावसाय ठप्प झाला. हळूहळू देश अनलॉकच्या दिशेने वळला आणि काही प्रमाणात जनजीवन पूर्ववत होत गेले. मात्र पार्लर आणि सलून व्यावसायिकांना नियम-अटींसह मोजक्याच गोष्टी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. परंतू त्यातून पार्लर व्यवसाय करणाऱ्यांचा खर्च काही भागत नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नैराश्यातून एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

काय आहे प्रकरण

गुजरातमधील अहमदाबाद शहरात राहणाऱ्या एका पार्लर चालवणाऱ्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनमुळे तिच्या व्यवसायाला मोठा फटका बसला असून त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. अस्मिता वाजानी असे त्या महिलेचे नाव असून ती घाटलोडीआ भागात वृंदावन सोसायटीत कुटुंबासोबत राहायची. लॉकडाऊनमुळे तिचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यानंतर पार्लर सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरही फार ग्राहक येत नव्हते. त्यामुळे अस्मिता या नैराश्यात गेल्या होत्या. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

- Advertisement -

हेही वाचा –

केंद्राने सांगितलं, कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचं खरं कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -