नवऱ्यानं केलं तिसरं लग्न, दुसऱ्या बायकोने ‘असा’ घेतला भन्नाट बदला!

मुजफ्फरगढ शहरातील डॉक्टर अब्दुल रशीद यांनी तिसरं लग्न केलं.

Mumbai
Up Family cancels the wedding, Bride Spends Too much lot of time on WhatsApp
(फोटो प्रातिनिधिक आहे)

एका व्यक्तीला तिसरं लग्न करणं चांगलच महागात पडलं आहे. या घटनेची माहिती पत्नीला मिळताच तीचे एका वेगळ्या प्रकारे आपल्या पतीचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असा एक प्रकार घडला आहे. महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कारण या महिलेने पतीचा बदला घेण्यासाठी त्याच्या अंगावर गरम पाणी फेकलं. यामुळे डॉक्टर अब्दुल रशीद असं नाव असलेल्या पतीचं शरीर 45 टक्के भाजलं आहे.

असा घडला प्रकार

मुजफ्फरगढ शहरातील डॉक्टर अब्दुल रशीद यांनी तिसरं लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीनं रागाच्या भरात त्यांच्यावर हल्ला केला.  रशीद यांनी तिसऱ्यांदा लग्न केलं होतं. यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीला राग आला. याचा बदला घेण्यासाठी त्यांनी थेट पतीवर गरम पाणी फेकलं. आरोपी महिलेविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केल्यानंतर लगेच सोडून दिलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मात्र रशीदच्या दुसऱ्या बायकोने गरम पाणी का ओतलं याच कारण अद्याप समोर आलेलं नाही. डॉक्टर अब्दुल रशीद यांनी अनेक लग्नं केली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र पतीच्या तिसऱ्या लग्नामुळेच ती चिडली होती आणि यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. पतीच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.


हे ही वाचा – …आणि एक- एक करून त्याने आपल्या तीनही मुलींना नदीत फेकलं!