लॉकडाऊनमध्ये कुत्र्याने केले असे काम, झाला हिरो

mumbai

करोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे कोणीही घराबाहेर पडू शकत नाही. मात्र याच चिंतेच्या वातावरणात सोशल मीडियावर मॅक्सिकोतील एका छोट्याशा कुत्र्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो लॉकडाऊनमध्ये आपल्या मालकासाठी चिप्स आणायला दुकानात गेला होता. ओजो अस या कुत्र्याचे नाव असून ओजोच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.

ओजोच्या मालकाचे नाव अंतोनियो मुनोज आहे. लॉकडाऊन असल्याने अंतोनियोने घराबाहेर पडणेच बंद केले आहे. घरात दोघेच राहतात. पण परवा अचानक अंतोनियोला चिप्स खाण्याची इच्छा झाली. मात्र घराबाहेर पडणे शक्य नसल्याने त्याने ओजोच्या गळ्यात सामानाची चिठ्ी लटकवली आणि २० डॉलरची नोटही. चिठ्टीत त्याने ओजोशी नीट वागा. नाहीतर तो चावेल. असे लिहले तसेच त्याच्याजवळ काही चिप्स पाठवा. पण लाल रंगाचे नको कारण ते तिखट असतात. ओजोच्या कॉलरमध्ये २० डॉलरची नोट अडकवली आहे ती घ्या. असे लिहले. त्यानंतर ओजोने थेट रस्त्या पलिक़डचे दुकान गाठले व तो दुकानदारासमोर जाऊन उभा राहीला. त्याच्या गळ्यातील चिठ्टी वाचल्यानंतर दुकानदाराने त्याला चिप्सचे पाकिट दिले व त्याच्या कॉलरमधील डॉलरही घेतले. नंतर ओजो शांतपणे रस्ता ओलांडून घरी आला. यावेळी अनेकजण दुकानात होते.

एवढा छोटा कुत्रा चिप्स घ्याय़ला आल्याचे बघून सगळेजण हरखले. अनेकजणांनी ओजोला मोबाईल व्हिडीओमध्ये कैद केले. नंतर काही वेळातच ओजोचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आणि ओजो हिरो झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here