कंटेन्मेंट झोनमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन!

lockdown shall continue to be in the containment zones till 30th november
कंटेन्मेंट झोनमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन!

देशातील कोरोना व्हायरसची पार्श्वभूमीवर लक्षात घेऊन केंद्र सरकारने लॉकडाऊन संदर्भात मोठी घोषणा केली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गृहमंत्रालयाने ३० सप्टेंबरला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आता ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहतील. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने अनेक गोष्टींना नियम आणि अटींसह संमती दिली आहे. पण आता कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन जारी केला. मग काही काळानंतर हळूहळू अनलॉकची प्रक्रियेला सुरुवात झाली. यादरम्यान अनेक गोष्टींना समंती देण्यात आली आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव नियंत्रित येताना दिसत आहे. देशातील रिकव्हरी रेट ९०.६२ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. इतकंच नाहीतर Active रुग्णांमध्ये देखील घट झाली आहे. अशा परिस्थिती आता जिम, रेस्टॉरंट, हॉटेल्स उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण आता कंटेन्मेट झोन असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन पूर्वीप्रमाणेच ३० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्य सूट असले याबाबत आज केंद्रीय गृहमंत्रालयाने आज मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याचनुसार रिओपनिंगबाबत ३० सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे ३० नोव्हेंबरपर्यंत कायम असणार आहे, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – आयकर विभागाच्या देशभरात ४२ ठिकाणी धाडी; कोट्यवधींचं घबाड सापडलं