घरCORONA UPDATEलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्याला केलं गोळ्या घालून ठार!

लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्याला केलं गोळ्या घालून ठार!

Subscribe

फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घाला, असा आदेश दिला आहे.

फिलिपिन्सधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या एका ६३ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलं. पोलिसांनी या व्यक्तीला चेकपॉईंटवर रोखल्यानंतर त्याने धमकी देत पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडत त्याला ठार केलं. फिलिपिन्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी आधीच लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घाला, असा आदेश दिला होता. लॉकडाऊनचं उल्लंघन केलं म्हणून ठार केल्याची ही पहिलीच घटना आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोसळणार; ५२ टक्के नोकर्‍या जाणार – सीआयआय

- Advertisement -

लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता. हा व्यक्ती हातात विळा घेऊन बाहेर फिरत होता. अगुसानच्या डेल नॉर्टे प्रांतातील नासीपिट शहरातील एका चेकपॉईंटवर त्याला पोलिसांनी रोखलं. त्यावेळी त्याने शिवीगाळी करायला सुरुवात केली. मास्क न घातल्याने तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला विचारणा केली असता, त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी गोळ्या घालून त्याला ठार केलं.

फिलिपिन्समध्ये १६ मार्चपासून लॉकडाऊन आहे. नागरिकांना घरातच राहण्याची तंबी दिली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठीच लोक घराबाहेर पडू शकतात. तसंच अत्यावश्यक यंत्रणेतील कर्मचाऱ्याना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. राष्ट्रपती रॉड्रिगो डुटेर्ट यांनी जनतेला लॉकडाऊनचं गांभीर्याने पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -