उत्तरप्रदेशात काँग्रेस लढणार सर्व जागा

लोकसभा निवडणुकासाठी उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसनं अखेर एकला चलोचा नारा दिला आहे. सपा आणि बसपानं आघाडी केल्यानंतर उत्तरप्रदेशात काँग्रेस एकटी पडली. त्यानंतर आता काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिला आहे.

Lucknow
congress claimed on 1 seat for lok sabha
Congress

लोकसभा निवडणुकासाठी उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसनं अखेर एकला चलोचा नारा दिला आहे. सपा आणि बसपानं आघाडी केल्यानंतर उत्तरप्रदेशात काँग्रेस एकटी पडली. त्यानंतर आता काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिला आहे. दरम्यान, काँग्रेस सर्व ८० जागा लढेल आणि विजयी देखील होईल असा विश्वास यावेळी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील निवडणुका या आता रंगतदार होणार आहेत.

शत्रु झाले मित्र

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलली असून एकमेकांचे हाडवैरी असलेल्या बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. भाजपप्रमाणे काँग्रेसलाही भ्रष्टाचारी म्हणत आघाडीतून त्यांना बाहेरचा रास्ता दाखवला आहे. फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अमेठी तसेच रायबरेली या दोन जागांवर उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी आघाडीची घोषणा केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली.

३८-३८ जागांचा फॉर्म्युला

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा असून बसपा ३८ आणि सपा ३८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, असेही मायावतींनी सांगितले. तर, उर्वरित जागा महाआघाडीत सामील होणार्‍या अन्य पक्षांसाठी सोडल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे लोकसभा २०१९च्या निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.

वाचा – सपा-बसपा वैरी झाले मित्र, उत्तर प्रदेशमध्ये आघाडी!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here