घरदेश-विदेशआचारसंहिता संपुष्टात आल्याचे निवडणूक आयोगाने केले जाहीर

आचारसंहिता संपुष्टात आल्याचे निवडणूक आयोगाने केले जाहीर

Subscribe

लोकसभा आणि चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी लागताच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (रविवार) आदर्श आचार संहिता समाप्त झाल्याची घोषणा केली. देशामध्ये ११ मार्च २०१९ रोजी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली होती. त्या दिवसापासून आचार संहिता लागू झाल्याचे आयोगाने जाहीर केले होते. लोकसभा निवडणूक २०१९ ही सात टप्प्यांमध्ये पार पडली. महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांमध्ये ही निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर २३ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ३०३ तर एनडीएला मिळून ३५३ जागा मिळाल्या आहेत.

तर चार राज्यापैकी अरुणाचल प्रदेश येथे पहिल्यांदाच भाजपप्रणीत सरकार स्थापन झाले आहे. तर ओडिशात बिजू जनता दल पक्षाने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. आंध्र प्रदेश राज्यात वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचा पराभव केला आहे. सिक्कीम राज्यात मुख्यमंत्री पवन चामलिंग यांचा २५ वर्षांनंतर पराभव झाला आहे. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने ३२ पैकी १७ जागा घेऊन बहुमत स्थापन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -