घरदेश-विदेश२२ विरोधकांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

२२ विरोधकांनी घेतली निवडणूक आयोगाची भेट

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल आदी नेते ईव्हीएमबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रवाना झाले. निवडणूक आयोगानेही त्यांच्या तक्रारीची दखल घेत उद्या, बुधवारी सकाळी त्यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे समजते. या बैठकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची १०० टक्के पडताळणी करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मागणीबद्दल विरोधकांची निवडणूक आयोगासोबत चर्चादेखील झाली. त्याआधी सुप्रीम कोर्टाने या मागणीवरुन विरोधकांना फटकारलं. याशिवाय निवडणूक आयोगानंही ईव्हीएमबद्दल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांना प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाला धक्का बसल्यास बिगर एनडीए सरकार स्थापन करण्याच्या शक्यतांवरदेखील बैठकीत चर्चा झाली. काँग्रेससह टीडीपी, बसपा, सपा, एनसीपी, टीएमसी आणि डाव्या पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

- Advertisement -

गेल्या चार-पाच दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणारे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला डावे पक्ष, बसपा, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीच्या नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन आणि सपा नेते रामगोपाल यादव आदी नेते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -