घरदेश-विदेशबाबरीबाबत वक्तव्य भोवलं; साध्वीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बाबरीबाबत वक्तव्य भोवलं; साध्वीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Subscribe

निवडणूक अधिकाऱ्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. त्यानंतर आता बाबरी मशिदीसंबंधीचे वक्तव्य करणं प्रज्ञासिंग यांना भोवलं आहे. निवडणूक अधिकाऱ्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर साध्वी प्रज्ञासिंह यांनी हे माझे कायदेविषयक प्रकरण असून माझे वकील त्याबाबत पाहत आहे, अशी माहिती एएनआयला दिली आहे.

- Advertisement -

मुलाखतीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य 

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अयोध्येमध्ये ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यावेळी मी देखील त्यात सहभागी होते. मला त्याचा अभिमान आहे, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले होते. बाबरी मशीद पाडताना मी सर्वात वरती चढले होते. देवाने मला ही संधी दिली त्याचा मला अभिमान आहे. त्या ठिकाणी राम मंदिर बांधले जाईल हे आम्ही नक्की निश्चित करु असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुलाखतीदरम्यान म्हणाल्या होत्या. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांना नोटीस बजावण्यात आली. तरी देखील साध्वी प्रज्ञासिंह मी तिथे गेले होते यावर ठाम होत्या. तसेच मी ही गोष्ट नाकारणार नाही. मी अयोध्येला जाऊन राम मंदिर बांधण्यासाठी मदत करणार आहे. कोणीही मला त्यापासून थांबवू शकत नाही असे साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -