घरदेश-विदेशलोकसभा निवडणूक कल : शेअर बाजारने घेतली उसळी

लोकसभा निवडणूक कल : शेअर बाजारने घेतली उसळी

Subscribe

लोकसभा निवडणुकीचे कौल भाजपाच्या बाजूने येऊ लागल्याने शेअर बाजारानेही मोठी उसळी घेतली असून सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आहे.

लोकसभा निवडणुकीचे कौल भाजपाच्या बाजूने येऊ लागल्याने शेअर बाजारानेही मोठी उसळी घेतली आहे. आज शेअर बाजार सुरु होतात सेन्सेक्स ५०० अंकानी वधारला असून निफ्टीने १५० अंकाची उसली घेतली आहे. सुरुवातीच्या १५ मिनिटातच शेअर बाजार ८०० अंकाने वधारुन ३९ हजार ८५० वर पोहोचला. यापूर्वी २१ मे रोजी एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्स ३९ हजार ५७१ अंकावर पोहोचला होता. तर निफ्टी २०० अंकांनी वाढून ११ हजार ९३० वर गेला होता. त्यामुळे आज निफ्टी १२ हजाराचा पल्ला गाठेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर रविवारी सायंकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले होते.

असा वधारला शेअर बाजार

शेअर बाजाराने दहा वर्षांतील विक्रमी उसळी घेतली होती. रविवारी दिवसभरत सेन्सेक्स १ हजार ४२१.९० अंकांनी वधारला तर निफ्टीतही तेजी पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे निफ्टीचा निर्देशांक ४२१.१० अंकांनी वधारला होता. रविवारी व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्सने ३९ हजार ३५२.६७ तर निफ्टीने ११ हजार ८२८.२५ अंकांचा टप्पा गाठला होता. लोकसभेच्या ५४२ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले. त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच पुन्हा केंद्रात सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवले होते. साधारण २८७ ते ३४० जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाल्यानंतर रविवारी अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली असून सकाळी साडेनऊ वाजता शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने उसळी घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -