घरदेश-विदेशतुम्ही मत कुणाला दिलं यावर मोदींची नजर - भाजप आमदार

तुम्ही मत कुणाला दिलं यावर मोदींची नजर – भाजप आमदार

Subscribe

गुजरातच्या दाहोदमध्ये झालेल्या सभेत भाजप आमदार रमेश कटारा थेट मतदारांनाच धमकावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 'तुम्ही मत कुणाला दिलं?' त्यावर मतदान केंद्रात मोदींनी बसवलेल्या कॅमेऱ्यांची नजर आहे, असे कटारा म्हणाले असून त्यांच्या या सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. या प्रचारा दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येत असताना देखील वाचाळवीर नेत्यांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. गुजरातच्या दाहोदमध्ये झालेल्या सभेत भाजप आमदार रमेश कटारा थेट मतदारांनाच धमकावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘तुम्ही मत कुणाला दिलं?’ त्यावर मतदान केंद्रात मोदींनी बसवलेल्या कॅमेऱ्यांची नजर आहे, असे कटारा म्हणाले असून त्यांच्या या सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय म्हणाले रमेश कटारा?

‘मोदींनी मतदान केंद्रांमध्ये कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे भाजप किंवा काँग्रेसला कोणी मतदान केले. त्या सगळ्यांवर मोदी नजर ठवून आहेत’, अस कटारा म्हणाले आहेत. ‘ईव्हीएमवर दाहोद मतदारसंघातील भाजप उमेदवार जसवंत भाभोर यांचा फोटो आहे. त्यासमोर कमळाचे चिन्ह असून ते पाहूनच बटन दाबा. कारण मोदींनी मतदान केंद्रांवर कॅमेरे बसवले आहेत. भाजपशिवाय अन्य कोणत्याही उमेदवाराला मतदान केले तर ते लगेच माहिती होईल. तुमच्या मतदान केंद्रातून भाजपला कुणी मत दिले नाही हे कळेल आणि त्यानंतर तुम्हाला काम मिळणार नाही’, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

कटारा यांना बजावली नोटीस

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कटारा यांना नोटीस बजावून त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत २४ तासांच्या आत उत्तर मागवले आहे. व्हिडिओमधील आवाज कटारा यांचाच असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे आजारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी विजय खराडी यांनी सांगितले आहे. तसेच कटारा हे अनावधानाने बोलले असावेत, पण ते खरंच तसं काही बोलले असतील तर मतदारांनी ते गांभीर्याने घेऊ नये, असे भाजप उमेदवार जसवंतसिंह भाभोर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले आहे.

माझ विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले

भाजप आमदार रमेश कटारा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. माझे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने कॅमेरे बसवले आहेत. त्याविषयी मी माहिती दिली आणि केंद्रांवर गोंधळ घालू नये, असे आवाहन मी मतदारांना केले आहे.

- Advertisement -

वाचा – राहुल आणि पवारांना फक्त निवडणुकीत शेतकरी आठवतो – अमित शाह

वाचा – दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -