घरदेश-विदेशLoksabha election Live Update: देशात ६३.२४ टक्के मतदान

Loksabha election Live Update: देशात ६३.२४ टक्के मतदान

Subscribe

देशातील एकूण १४ राज्यांमधल्या ११५ जागांवर मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशातील एकूण १४ राज्यांमधल्या ११५ जागांवर मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील १४, गुजरातमधील २५, केरळच्या २०, बिहारमधील ५, उत्तर प्रदेशातील १०, आसाममधील ४, कर्नाटकातील १४, पश्चिम बंगालमधील ५, ओडिशातील ६, छत्तीसगडमधील ७, गोव्यातील २ आणि दादरा-गनर हवेली, दमण व दीव, जम्मूतील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -