आज भाजपची पहिली यादी; नव्या चेहऱ्यांना देणार संधी?

गेल्या ५ वर्षात खराब कामगिरी केलेल्यांचा पत्ता कट होऊन, नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai
BJP

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसर, आज दिल्लीत भाजपची केंद्रिय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीत पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीला राहणार उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. दरम्यान, पहिल्या यादीत १०० नावांचा समावेश असेल अशी चर्ची होती. आज नेमकी किती नाव या यादीत असणार याचा खुलासा होईल. यावेळी  डेंजर झोन मध्ये असलेल्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

महाजन, सोमय्यांबाबतचा सस्पेन्स कायम

मागील पाच वर्षात पक्षामध्ये जे चांगली कामगिरी करू शकले नाहीत, त्यांचा पत्ता कट करून काही नवीन चेहरे अचानक समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  महिन्याभरापूर्वी खासदारांच्या कामाचा अहवाल करून त्यांना गुण देण्यात आले आहेत. यावरून ज्या खासदरांची कामगिरी समाधान कारक नसेल, त्यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी आपलं महानगरला दिली आहे. दरम्यान,  खासदार पूनम महाजन आणि किरीट सोमय्या यांच्या उमेदवारी बाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरदेखील चर्चा सुरू असून, शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार विरोध केला होता. दुसरीकडे दिलीप गांधी यांच्यासह काही विद्यमान खासदारांचा पत्ता गुल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजच्या या महत्वपूर्ण बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील आणि संघटन मंत्री विजय पुराणिक दिल्लीच्या बैठकीला हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here