घरदेश-विदेशसुमित्रा महाजन भडकल्या; आपल्यापेक्षा शाळेची मुलं बरी

सुमित्रा महाजन भडकल्या; आपल्यापेक्षा शाळेची मुलं बरी

Subscribe

भाजप, काँग्रेस, अण्णा द्रमुक, तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवर गदारोळ सुरु केला. काही खासदारांनी तर वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संसदेचे हिवाळी अधिवेश वादळी ठरत आहे. गेल्या पाच दिवसापासून संसदेच्या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज होऊ शकत नाही. गोंधळ सुरु असल्याने कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षा समित्रा महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्या खासदारांवर भडकल्या. आमच्यापेक्षा शाळेतील मुलं बरी अशा शब्दात त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आज देखील गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज झाले नाही. गोंधळामुळे कामकाज तहकूब झाल्यानंतर १२ वाजता पुन्हा सुरु झाले. मात्र त्यानंतर पुन्हा खासदारांनी गोंधळ सुरु केल्यानंतर सुमित्रा महाजन चिडल्या आणि त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

चर्चेसाठी सरकार तयार

लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले खरे मात्र भाजप, काँग्रेस, अण्णा द्रमुक, तेलगू देसम पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवर गदारोळ सुरु केला. काही खासदारांनी तर वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘या लोकसभेचं हे अखेरचं अधिवेशन आहे. तुमचेही काही महत्वाचे मुद्दे आहेत. संसदेचं अधिवेशन चर्चेसाठी आहे आणि चर्चेसाठी सरकार तयार आहे. गदारोळ करण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

- Advertisement -

शाळेतील मुलं बरी

सुमित्रा महाजन यांनी असे म्हटले आहे की, जर तुमचे काही मुद्दे असतील र मी स्वत: सरकारला सांगेन की चर्चा करा. पुढे त्यांनी असे म्हटले की, ‘विदेशातील शिष्टमंडळं आपल्याकडे येतात. तुमच्याकडे हे काय चाललंय, असा प्रश्न ते विचारतात. शाळेतील विद्यार्थी मॅसेज पाठवतात की, आमच्या शाळा यापेक्षा चांगल्या चालतात. आपण शाळेच्या मुलांपेक्षाही वाईट आहोत का असा सवाल यावेळी त्यांनी सदस्यांना विचारला आहे. राफेल करार, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी, तामिळनाडूतील कावेरी डेल्टा प्रकरण यावरून गेल्या पाच दिवसापासून संसदेत गदारोळ सुरू आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

लोकसभा सोमवार पर्यंत तहकूब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -