घरCORONA UPDATEफक्त Covid-19 नाही, लाँग कोविडसुद्धा हानीकारकच! पण नक्की काय आहे हा प्रकार?

फक्त Covid-19 नाही, लाँग कोविडसुद्धा हानीकारकच! पण नक्की काय आहे हा प्रकार?

Subscribe

आधी कोरोनाची लक्षणं आणि ती वाढल्यानंतर होणारा Covid 19 हा आजार यामुळे गेल्या ९ ते १० महिन्यांमध्ये जगभरात आत्तापर्यंत १० लाखाहून जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, Corona प्रमाणेच Long Covid (लाँग कोविड) देखील हानीकारक ठरू लागला आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनामध्ये ही बाब समोर आली आहे. त्यामध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये देखील लाँग कोविडची लक्षणं दिसून आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील काळजी घेणं गरजेचं असल्याचं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. किंग्ज कॉलेजप्रमाणेच जगभरात इतरही काही संस्थांनी केलेल्या संशोधनातून हीच बाब समोर आली आहे. अमर उजालाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय आहे Long Covid ?

लाँग कोविड म्हणजे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये पुढे अनेक महिने कोरोनाचीच लक्षणं (Corona Symptoms) दिसत राहाणं. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं दिसतात, त्यांना लाँग कोविडचा धोका अधिक असतो. विशेषत: वृद्ध, अधिक वजन असलेले किंवा अस्थमाचा आजार असलेल्या रुग्णांना लाँग कोविड होण्याचा धोका जास्त असतो असं या संशोधनातून समोर आलं आहे. प्रामुख्याने कोरोनाची लागण झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ज्यांना ५ हून जास्त प्रकारची गंभीर लक्षणं दिसू लागतात, त्यांचा यामध्ये समावेश होतो.

- Advertisement -

ब्रिटन आणि स्वीडनमध्येही यासंदर्भात अशाच स्वरूपाचं संशोधन झालं. त्यानुसार ४ हजार रुग्णांवर संशोधन करण्यात आलं. त्यात प्रत्येक ४ रुग्णांपैकी एका रुग्णामध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील दीर्घ काळ लक्षणं दिसून आली. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात झालेल्या संसोधनानुार लाँग कोविड असलेल्या रुग्णांना बरे झाल्यानंतर देखील दीर्घकाळ थकवा जाणवत राहाणं हे सर्वात सामान्य लक्षण आहे. त्यासोबतच श्वास घेण्यास त्रास होणे, डोकं दुखणं, अंग दुखणं, ऐकायला किंवा दिसायला कमी होणं, वास किंवा चव न लागणं अशी लक्षणं दिसत राहातात. काही रुग्णांमध्ये नैराश्य आणि एन्झायटी देखील दिसून आली.

रोममध्ये याच प्रकारच्या संशोधनात १४३ रुग्णांपैकी ८७ रुग्णांना बरे झाल्यानंतर देखील दोन महिन्यांपर्यंत कोरोनाचे अनेक लक्षणं दिसून आले. खोकला, अंगदुखी, थकवा, फुफ्फुसांमध्ये समस्या, ह्रदयात समस्या, किडनीची समस्या अशी लक्षणं दिसून आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -