घरदेश-विदेश'राम सुद्धा थांबवू शकत नाही बलात्काराच्या घटना'

‘राम सुद्धा थांबवू शकत नाही बलात्काराच्या घटना’

Subscribe

राम सुद्धा बलात्काराच्या घटना थांबवू शकत नाही असे वादग्रस्त वक्तव्य उत्तरप्रदेशमधील भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांनी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

वादग्रस्त विधान आणि भाजप नेते हे समिकरणच जणू! एखादा भाजप आमदार किंवा नेता वादग्रस्त करतो तोच दुसऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य! वादग्रस्त विधानांसाठी लागलेली स्पर्धाच असे म्हणावे लागेल. या वादग्रस्त वक्तव्यांच्या यादीत आता उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांच्या विधानाची देखील भर पडली आहे. आजच्या काळात राम देखील बलात्काराच्या घटना रोखू शकत नाही असे वक्तव्य आमदार सुरेंद्र सिंग यांनी केले आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. हे एक प्रकारचे प्रदुषण आहे. त्यापासून कुणालाही वाचणे अशक्य! इतरांच्या कुटुंबियांना आपल्या बहिणीसारखी वागवणे हे लोकांच्या हातात आहे. बलात्काराच्या घटनांवर कायद्याने नाही तर केवळ मुल्यांच्या मदतीनेच नियंत्रण ठेवता येऊ शकते असे देखील सिंग यांनी यावेळी म्हटले. उन्नाव केस संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सुरेंद्र सिंग यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उन्नावमध्ये मुलीचा विनयभंग करून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्या प्रश्नाला उत्तर देताना सुरेंद्र सिंग यांनी केलेल्या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सिंग यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका

उत्तरप्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंग यांच्या वादग्रस्त विधानाची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील सिंग यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींचे जाहीरपणे समर्थन केले होते. शिवाय, सरकारी कर्मचाऱ्यांची तुलना ही देहविक्री करणाऱ्या महिलांशी केली होती. सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा देहविक्री करणाऱ्या महिला बऱ्या. पैसे घेऊन आपले काम नीट करतात. पण, सरकारी कर्मचारी पैसे घेऊन देखील तुमचे काम व्यवस्थित करतील याची गॅरंटी नसल्याचे सिंग यांनी म्हटले होते. त्यावरून देखील मोठा वाद उभा राहिला होता. तसेच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना शूर्पणखा हिच्याशी केली होती. तसेच ताज महालचे नाव राम महल ठेवावे अशी मागणी देखील केली होती. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते.

- Advertisement -

भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य

वादग्रस्त वक्तव्य करणारे सुरेंद्र सिंग हे काही पहिले भाजप नेते नाहीत. यापूर्वी भाजप खासदार साक्षी महाराज यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी जास्त मुलांना जन्म द्यावे असे वक्तव्य केले होते. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी देखील रामजादों कि सरकार बनेगी या हरामजादों की असे वक्तव्य केल्याने नवीन वादाला तोंड फुटले होते. शिवाय केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानमध्ये जावे असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. या सर्वांच्या यादीत आता सुरेंद्र सिंग यांची देखील भर पडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -