घरदेश-विदेश'प्रभू रामांनी स्वप्नात येऊन माझा धर्म बदलला'

‘प्रभू रामांनी स्वप्नात येऊन माझा धर्म बदलला’

Subscribe

'प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनीच मला हिंदू धर्म स्विकारायला सांगितला होता', असा दावा उत्तरप्रदेशच्या संजू राणा या व्यक्तीने केला आहे.

उत्तरप्रदेशमध्ये राहणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने नुकताच आपल्या संपूर्ण कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. मात्र, ही बाब इतकी साधीसुधी नाही. प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनीच मला धर्मबदल करायला सांगितलं, असा दावा या इसमाने केला आहे. या व्यक्तीचं आधीचं नाव शहजाद असं होतं पण हिंदू धर्म स्विकारल्यानंतर आता तो संजू राणा झाला आहे. संजू हा उत्तरप्रदेशच्या शामली गावचा रहिवासी आहे. ‘माझे पूर्वजही मूळचे हिंदूच होते पण त्यांना धर्मांतर करुन मुस्लिम धर्म स्विकारायला भाग पाडण्यात आलं होतं’, असं त्याचं म्हणणं आहे. संजू सांगतो की, गेल्या १५-२० दिवसांपासून प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नामध्ये येत होते आणि मला माझा मूळ हिंदू धर्म स्विकारायला सांगत होते. काही शतकांपूर्वी झालेल्या परकीय आक्रमणात माध्या पूर्वजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याचं संजू राणा सांगतो. मात्र, आता धर्मांतरानंतर मी पुन्हा मूळ धर्मात परतत आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.


सलाम: अपघात रोखण्यासाठी ‘जखमी’ पयांनी धावणारा देवदूत

मुस्लिम समाजाकडून धमकावलं गेलं

मी माझ्या मर्जीने आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितल्यामुळे हिंदू धर्म स्विकारला आहे. हिंदू धर्मात प्रवेश करण्यासाठी माझ्यावर कुठल्याही संघटनेने किंवा व्यक्तीने दबाव टाकलेला नाही. माझे कुटुंबियदेखीस या निर्णयामुळे खूष असल्याचं संजू राणा सांगतो. मात्र, प्रभू राम माझ्या स्वप्नात आल्यामुळे मी धर्म बदलल्याचं समजताच, मुस्लिम सामाजाची माझ्यासोबतची वागणूक बदलली. या गोष्टीची भीती मला होतीच पण इतकी वाईट वागणूक मिळेल याची अपेक्षा नव्हती. संजूने सांगितल्यानुसार, धर्मांतरानंतर काही लोकांनी त्याला उघड उघड धमक्या दिल्या. त्याचे स्वत:चे काकासुद्धा धर्मपरिवर्तनाच्या निर्णयाशी सहमत नव्हते. दरम्यान, संजू राणाने त्वरित पोलीसांकडे संरक्षणाची मागणी केली. संजू सांगतो की मी अक्षरश: पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन माझा आणि कुटुंबियांचा जीव वाचवला. मात्र, आता मला माझ्या परिवाराची चिंता लागून राहिली असल्याचंही त्याने सांगितलं. तर दुसरीकडे संजू राणेच्या जीवाला धोका असल्याचा ठोस पुरावा अद्याप आम्हाला मिळाला नसल्याचं पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागल्याचं चित्र आहे.

हिंदू धर्म स्विकारुन शहजाद बनला संजू राणा

वाचा: महानायक अमिताभ बच्चन सापडले अडचणीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -