घरदेश-विदेशहरवलेली अंगठी ९ वर्षांनी सापडली

हरवलेली अंगठी ९ वर्षांनी सापडली

Subscribe

टॉयलेटमध्ये 'फ्लश' झालेली अंगठी तब्बल ९ वर्षांनी सापडल्याची आश्चर्यजनक घटना न्यू जर्सी येथे घडली आहे.

एखादी मौल्यवान वस्तू टॉयलेटमध्ये पडली का ती वस्तू पुन्हा मिळणे कठीण असते. मात्र अशीच एक मौल्यवान वस्तू टॉयलेटमध्ये पडली होती आणि ती तब्बल ९ वर्षांनी सापडल्याची आश्चर्यजनक घटना न्यू जर्सी येथे घडली आहे. एका महिलेची हिरेजडित अशी सोन्याची अंगठी टॉयलेटमध्ये पडली होती. मात्र या महिलेला ती अंगठी पुन्हा मिळाल्याने या महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

नेमके काय घडले?

न्यूयॉर्क मधील न्यू जर्सी येथे पौला स्टँटन (६०) या महिलेला तिच्या लग्नाच्या विसाव्या वाढदिवसाला हिरेजडित सोन्याची अंगठी तिच्या नवऱ्याने तिला भेटवस्तू म्हणून दिली होती. पौल या टॉयलेट स्वच्छ करत असताना त्यांच्या बोटातील सैल असलेली अंगठी अचानक टॉयलेटमध्ये ‘फ्लश’ झाली. ही घटना ९ वर्षापूर्वी म्हणजेच २००९ साली घडली होती. त्यामुळे आता ही फ्लश झालेली अंगठी पुन्हा मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आपण ही अंगठी गमावल्याची भावना पौला यांच्या मनात आजपर्यंत होती. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या नातेवाईकांकडे साउथ कॅरोलिना येथे गेल्या होत्या. मात्र त्या पुन्हा घरी आल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

- Advertisement -

घराच्या दरवाजावर लावण्यात आली चिठ्ठी

पौला या घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्यांच्या घराच्या दरवाजावर एक चिठ्ठी लावण्यात आली होती. या चिठ्ठीमध्ये एक मजकुर लावण्यात आला होता. त्यामध्ये ‘पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट’ला संपर्क साधा असे या चिठ्ठीत लिहीण्यात आले होते. आपल्या घराजवळ काहीतरी खोदकाम करायचे असेल असे त्यांना ते चिठ्ठी वाचून वाटले. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या विभागातील टेड गोगोल (६४) या व्यक्तीला पौला यांची हरवलेली अंगठी पुन्हा सापडली. टेड गोगोल हे कर्मचारी ड्रेनेज लाइनची नियमित देखभाल – दुरुस्तीची कामे करत असताना त्यांना चमकणारी एक वस्तू दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता सोन्याची हिरेडित अंगठी असल्याचे दिसून आले. त्या अंगठीवर स्टँटन दाम्पत्याची आद्याक्षरे अंगठीवर कोरलेली असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांना केल्या काही वर्षांपूर्वी एक महिला सोन्याची अंगठी शोधत असल्याचे त्यांना आठवले. त्यांनी तडक पौला यांचे घर गाठले. मात्र घरी कोणी नसल्याने त्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजावर चिठ्ठी लावून ठेवली होती. अखेर त्यांना ती अंगठी सापडल्यानंतर त्यांनी सोनाराच्या सल्ल्यानुसार विशिष्ट रसायनांमध्ये उकळून घेतल्यानंतर पौला यांनी ती अंगठी परिधान केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -