Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मिस्ड कॉल द्या गॅस सिलेंडर बुक करा

मिस्ड कॉल द्या गॅस सिलेंडर बुक करा

सिलेंडर बुकिंगसाठी LPGने दिलेल्या नंबर फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता गॅस बुकिंग करणे आणखी सोपे होणार आहे.

Related Story

- Advertisement -

गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. सिलेंडर बुकिंग करताना बऱ्याच वेळा गॅस एजेंन्सीचा नंबर शोधावा लागतो. नंबर मिळाल्यांनतरही बऱ्याचदा कॉल्स वेटींगवर ठेवले जातात. त्यामुळे ग्राहकांचा खूप खोळंबा होतो. मात्र आता LPG गॅसने ग्राहकांसाठी नवीन सेवा आणली आहे. आता फक्त एका मिस्ड कॉलने सिलेंडर बुक करता येणार आहे. सिलेंडर बुकिंगसाठी LPGने दिलेल्या नंबर फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता गॅस बुकिंग करणे आणखी सोपे होणार आहे. LPG वापरणाऱ्या ग्राहकांना 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. पेस्ट्रोलियम मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

मिस्ड कॉलच्या सेवेमुळे सिलेंडर बुकिंग करणे आणखी सोपे झाले आहे. त्यामुळे आता सिलेंडर बुक करताना खूप वेळ कॉल होल्डवर रहावे लागणार नाही. त्याचबरोबर सिलेंडर बुकिंग करताना IVRS च्या कॉल सेवाधारकांना कोणतेही अतिरिक्त चार्ज भरावे लागणार नाहीत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी भुवनेश्र्वरमध्ये ही नवी मिस्ड कॉल सेवा लाँच केले आहे.

- Advertisement -

आज भुवनेश्वरमध्ये गॅस बुकिंगसाठीच्या फ्रि मिस्ड कॉल सेवा सुरू केली आहे. भारतात इतर राज्यातही ही सेवा सुरू करणार असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे. एका दिवसाच्या आत सिलेंडरची डिलिव्हरी करण्यात यावी यासाठी गॅस एजेंन्सी आणि डिस्ट्रिब्युटर्स सांगण्यात आले आहे,असेही ते म्हणाले. गेल्या ६ दशकांपासून जवळपास २ करोड लोक LPGसोबत जोडले गेले होते. मात्र गेल्या ६ वर्षांपासून ३० करोड लोकांपर्यत LPG पोहचले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – सातशे रुपयांचा LPG सिलेंडर विकत घ्या दोनशे रुपयांत; अशी मिळवा ऑफर

- Advertisement -