घरदेश-विदेशनववर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG Cylinder महागले; बघा वाढलेले दर

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG Cylinder महागले; बघा वाढलेले दर

Subscribe

HPCL, BPCL सारख्या ऑईल मार्केंटिंग कंपन्यांनी २०२१ या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या दरात वाढ केली आहे. डिसेंबर महिन्यातच या ऑईल कंपन्यांनी घऱगुती गॅस म्हणजे एलपीजी सिलिंडरच्या दरात दोन वेळा वाढ करून १०० रूपयांपर्यंत दर वाढवले होते. त्यामुळे विना सब्सिडीवाल्या १४.२ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ६४४ रूपयांवरून ६९४ रूपये झाली आहे. दरम्यान, बिना सब्सिडीवाल्या १४.२ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. व्यवसायिक सिलिंडर किंमतीच्या संदर्भात ही दरवाढ करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या महिन्यात व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ९१ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर नोव्हेंबर महिन्यात १९ किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना १२९० रूपयात मिळत होता. तर १ डिसेंबरपासून या व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर ९१ रूपयांनी वाढले आणि सिलिंडरच्या किंमतीत वाढ होऊन १३८१.५० रूपये झाले आहे.

- Advertisement -

दिल्लीत १९ किलोग्रॅम वजन असणाऱ्या LPG Cylinder च्या किंमतीत १७ रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून १३३२ रूपयांना मिळणाऱ्या सिलिंडरची किंमत १३४९ झाली आहे. तर कलकत्तामध्ये १९ किलो वजन असणाऱ्या घरगुती गॅसची किंमत १३८७.५० रूपयांवरून १४१० रूपयांवर पोहोचली आहे. यासह या गॅसच्या किंमतीत २२.५० रूपयांनी वाढ झाली असून घरगुती गॅसची किंमत ७२०.५० रूपये असणार आहे. दरम्यान चैन्नईसह मुंबई शहरासंदर्भातील परिस्थिती पाहता हे दर १,२९७.५० रूपयांपासून १,४६३.५० रूपयांपर्यंत वाढले आहेत. या दोन्ही मोठ्या शहरात १७ रूपयांनी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.


कोरोना लसीची प्रतिक्षा संपणार? ‘या’ तीन कंपन्या लशीच्या शर्यतीत

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -