घरदेश-विदेशघरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला!

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला!

Subscribe

मुंबईत विनाअनुदानित सिलिंडर ६६५ रुपयांवर तर नवी दिल्लीत ६९५ रुपयांना हा सिलिंडर मिळेल, अशी माहिती इंडियन ऑइलतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

सलग चौथ्या महिन्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यानुसार नवी दिल्लीत १३.५ तर मुंबईत १४ रुपयांनी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. एक डिसेंबर पासून नवे दर लागू झाले आहेत. परिणामी मुंबईत विनाअनुदानित सिलिंडर ६६५ रुपयांवर तर नवी दिल्लीत ६९५ रुपयांना हा सिलिंडर मिळेल, अशी माहिती इंडियन ऑइलतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

अशी ठरते सिलिंडरची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनदरांचा आढावा घेऊन सरकारी इंधन कंपन्यांतर्फे सिलिंडरचे दर निश्चित करण्यात येतात. महिन्याच्या पहिल्या तारखेलाच या सिलिंडरची सुधारित किंमत जाहीर करण्यात येते. डॉलर व रुपया यातील विनिमय दराचाही या किमतीवर परिणाम होतो. दरम्यान मागील चार महिन्यात घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत वाढत आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये हा सिलिंडर १५ रुपयांनी महाग झाला होता. तर, नोव्हेंबरमध्ये या सिलिंडरमध्ये ७६ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

- Advertisement -

पाटण्यात सर्वांत जास्त दर

देशभरात दररोज तब्बल ३० लाख घरांना इंडियन ऑइलतर्फे सिलिंडरचे वितरण करण्यात येते. सध्या चालू सुधारित दरांनुसार देशात पाटणामध्ये ७९३.५ रुपये किंमतीला मिळत आहे. त्यापाठोपाठ हैदराबाद मध्ये ७४८ रुपयांना तर लखनऊ मध्ये ७३० रुपये तसेच कोलकाता, भूवनेश्वर मध्ये प्रत्येकी ७२५.५ रुपये किंमतीला गॅस सिलिंडर मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -