घरताज्या घडामोडीयेत्या १ डिसेंबरपासून, 'हे' ४ नियम लावणार खिशाला कात्री

येत्या १ डिसेंबरपासून, ‘हे’ ४ नियम लावणार खिशाला कात्री

Subscribe

येत्या १ डिसेंबरपासून नियमांमध्ये बदल होणार आहेत. जाणून घेऊया कोणते बदलणार नियम.

सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक नियम येत्या १ डिसेंबर पासून बदलले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या नियमांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या नियमांमध्ये एलपीजी सिलिंडरसह, रेल्वे आणि बँकांसंबंधीच्या अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. सगळ्याच महत्त्वाचे म्हणजे १ डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतींमध्येही बदल होणार आहे. जाणून घेऊयात काय होणार आहेत नवे बदल.

एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलणार

- Advertisement -

सरकार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलते. या किंमतीत वाढ किंवा घट होते. त्यानुसार येत्या १ डिसेंबरपासून देशभरात गॅसच्या किंमती बदल्या जाणार आहेत.

२४ तास मिळणार RTGS सुविधा

- Advertisement -

बँकांच्या पैशांच्या व्यवहारासंदर्भाचतील नियम येत्या १ डिसेंबरपासून बदलणार आहेत. आरबीआयने आरटीजीएस सुविधा २४ तास सुरु ठेवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डिसेंबरपासून आरटीजीएसमार्फत २४ तासांत कधीही पैसे ट्रान्सफर करु शकता.

प्रीमियममध्ये करण्यात आला बदल

पाच वर्षानंतर तुम्ही विमाधारक प्रीमियमची रक्कम ५० टक्के कमी करु शकता. म्हणजे अर्धा हप्ता देऊनही तुम्ही पॉलिसी चालू ठेवू शकता.

नव्या रेल्वे धावणार

भारतीय रेल्वे १ डिसेंबरपासून नव्या गाड्या चालवणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर रेल्वेने गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले असून याचा किंमतीवर देखील परिणाम होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -