योगी सरकारनं झकाना स्टेडियमचं नाव बदललं

योगी सरकारनं आता लखनऊमध्ये झकाना स्टेडियमचं नामांतरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असं केलं आहे. लखनऊमध्ये जवळपास २४ वर्षांनंतर ६ नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध वेस्ट इंडिजमध्ये टी - २०चा सामना होणार आहे.

Lucknow
yogi
योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तरप्रदेश

अलाहाबादचं नाव प्रयागराज करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नामांतराचा निर्णय घेतला आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी राजधानी लखनऊमधील झकाना स्टेडियमचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं आहे. विशेष बाब म्हणजे राज्यपालांनीही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये होणा-या सामन्यापूर्वी केवळ एक रात्र आधीच या स्टेडियमचं नाव बदललं गेलं आहे. त्यामुळे झकाना स्टेडियम आता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम या नावानं ओळखलं जाईल. लखनऊमध्ये जवळपास २४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामना होत आहे. ६ नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध वेस्ट इंडिजमध्ये हा सामना होणार आहे. त्यामुळे झकाना स्टेडियम न म्हणता आता या स्टेडियमला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम म्हणून यापुढे ओळखले जाईल.

वाचा – अलाहाबादचं नाव ‘प्रयाग’ करण्याची सिद्धार्थनाथ सिंहांची मागणी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here