धक्कादायक! पतीने आपल्या पत्नी चिमुरडीची केली हत्या; शरीराचे केले २२ तुकडे आणि…

पोलिसांनी आरोपी व्यक्तीला केली अटक

प्रातिनिधीक फोटो

मध्य प्रदेशमध्ये एक अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राज्यातील रीवा जिल्ह्यात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसह एक वर्षाच्या निरागस मुलीची हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे २२ तुकडे केले. या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली असून पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे.

असा घडला प्रकार

आरोपी चिंदालाल साकेत याची बुधवारी त्याच्या पत्नीबरोबर वाद झाला. यानंतर संतप्त पतीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी साकेतने आपल्या पत्नीचा चाकूने खून केला. हा प्रकार पाहून एक वर्षाच्या रडणार्‍याचा चिमुरडीचा गळा आवळून त्याने तिचा खून केला. आई आणि मुलीची हत्या केल्यानंतर आरोपींनी दोन्ही मृतदेहांचे तब्बल २२ तुकडे केले. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपी चिंदालाल साकेत याने आपला गुन्हा कबूल केला आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) राकेश सिंह यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, आरोपी गुरुवारी मृतदेह लपविण्यासाठी गावाबाहेर जात असताना त्याला अटक करण्यात आली. हा आरोपी एका पोत्यात आपल्या पत्नीचे आणि मुलीच्या शरीराचे अवयव घेऊन जंगलात घेऊन जात होता, जेव्हा गावकऱ्यांनी त्याला रोखले. त्याकडे असणाऱ्या पोत्यातून दुर्गंधी येत असल्याने गावकऱ्यांनी त्याची तपासणी केली. यावेळी त्यांनी पोत्याची तपासणी केली तेव्हा त्यांना मुलगीच्या शरीरचे काही अवयव सापडले.


तुम्ही ATM मधून ५ हजाराहून अधिक पैसे काढताय का? तर ‘हे’ नक्की वाचा