घरताज्या घडामोडीसेल्फीने घेतला महिलेचा जीव, चार तासांनी सापडला मृतदेह

सेल्फीने घेतला महिलेचा जीव, चार तासांनी सापडला मृतदेह

Subscribe

मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये आपल्या परिवारासोबत सहलीला गेली होती.

आज काल सेल्फी काढणं हे फॅशन झालं आहे. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका असं वारंवार सांगितलं जातं. सेल्फी काढताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. ३० वर्षीय महिला सेल्फी काढताना १ हजार फूट दरीत कोसळून तिचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये आपल्या परिवारासोबत सहलीला गेली होती. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. जाम गेटच्या सुरक्षारक्षकाच्या सांगण्यावरून ही घटना गुरूवारी सकाळी ११:४५च्या सुमारास घडली.

- Advertisement -

नीतू महेश्वरी असं या महिलेचं नाव आहे. ही महिला आपल्या कुटूंबासोबत इंदोरमध्ये राहते. सहलीवरून परत घरी जात असताना ५५ किलोमीटरवर असलेल्या जाम गेट घाटात ती कुटुंबासोबत थांबली होती. आपल्या ५ वर्षांच्या मुलासोबत तिथल्या परिसराचे फोटो काढण्यासाठी महिलेनं फोन बाहेर काढला. जाम गेटच्या थोड्या खालच्या बाजूच्या घाट सेक्शनमध्ये सेल्फी घेण्यासाठी उतरली. सेल्फी घेता घेता महिलेचा पाय घसरला आणि खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

- Advertisement -

मृत महिला नीतू महेश्वरी या इंदोरच्या शहरी भागात राहतात. आपल्या कुटुंबासोबत त्या सहलीला आल्या होत्या. सहलीवरून परत जात असताना त्या जाम गेट घाटात त्या थांबल्या होत्या,अशी माहिती तिथल्या पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोल दरीत कोसळलेल्या महिलेचा शोध घ्यायला सुरूवात केली. तब्बल चार तासांच्या शोधमोहिमे नंतर मृत महिलेला बाहेर काढण्यात आलं. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून घटनेची चौकशी सुरू आहे.


हेही वाचा – महिलेने रस्त्यावर कचरा टाकला, पालिकेने तोच कचरा उचलून तिच्या घरात टाकला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -